BREAKING NEWSE-PaperTOP NEWSधर्ममहाराष्ट्रराजनीति
Trending

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच विमान आपघातात दुर्दैवी निधन

संपूर्ण महाराष्ट्रासह देशावर शोककळा....!

बारामती (पुणे) – विमान कोसळल्यानंतर काही क्षणांतच विमानाला भीषण आग, सर्व प्रवाशांचा मृत्यू

विमान कोसळताच काही सेकंदांतच त्याला भीषण आग लागली. अपघातस्थळी काळ्या धुराचे मोठे लोट पसरले असून परिसरात एकच खळबळ उडाली होती. नागरी विमानवाहतूक महासंचालनालय (DGCA) तसेच पीटीआय (PTI) वृत्तसंस्थेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातातून कोणाचाही जीव वाचू शकला नाही.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई पीएफओचे अधिकारी विदीप जाधव, विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी तसेच विमानातील आणखी एक कर्मचारी यांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अपघात इतका भीषण होता की विमान अक्षरशः कोळसा झाले होते. आगीमुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.

काही जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी सर्वांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून बारामतीसह राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

दरम्यान, अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी DGCA कडून चौकशीचे आदेश देण्यात आले असून ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!