अकोले धुमाळवाडी येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

अकोले:(सुदिन न्यूज)विश्वकर्मा भगवंत देवस्वरूप असून सृष्टीचे सर्जन करतो व सूर्य स्वरूपाने प्रकाशमान होऊन साऱ्या जगाचे प्रकाश उष्णता देऊन पोषण करतो हे एक देवता भूमंडळासह ब्राह्मंडाचा कर्ताधर्ता आहे साक्षात ब्रह्म विष्णू महेश हे प्रभु विश्वकर्माचे अंश आहेत विश्वासाठी कर्म करण्याचे काम प्रभू विश्वकर्मा महाराजांनी केले आहे ज्या विश्वकर्मा समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे अस्तित्व आपण ठेवले पाहिजे त्यासाठी समाजातील समाज बांधवांनी व कार्यकर्त्यांनी संघटित व्हावे असे आवाहन अकोले तालुका विश्वकर्मा जयंती उत्सव समितीच्या वतीने धुमाळवाडी येथे प्रभू विश्वकर्मा मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना समाज प्रबोधनकार ह भ प बाळनाथ महाराज भागवत यांनी श्रोत्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले


l
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते भाऊराव जाधव हे होते यावेळी मान्यवर म्हणून ह भ प बाळनाथ महाराज भागवत ह भ प प्राध्यापक दीपक राऊत ह भ प कुमारी तेजल राजेंद्र शिंगवन धुमाळवाडी चे माजी सरपंच डॉक्टर रवींद्र गोरडे पोलीस पाटील सौ प्रणाली ताई धुमाळ सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील धुमाळ अण्णासाहेब शेटे पांडुरंग शिरसाट ईश्वर वाकचौरे नगरसेवक शरद नवले एडवोकेट वसंतराव मनकर वकील संघाचे अध्यक्ष पीडी गोडसे आदि मान्यवर उपस्थित होते
बाळनाथ महाराज म्हणाले की समाजातील कार्यकर्त्यांनी आपल्यातील मी पणा व अहंकार बाजूला ठेवा एकमेकाची चर्चा व कुटाळ करू नका समाजातील तरुणांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचा उत्साह वाढविला हा उत्साह उर्जा देणार आहे ज्येष्ठांनी काही गोष्टींमध्ये आपल्या आचारसहिता घालून घ्यावी तरच एकमेकातील हेवेदावे कमी होतील इतर समाज संघटित होऊन आपला उत्कर्ष करत आहे मात्र आपण फक्त जयंती पुरते एकत्र येतो त्यानंतर परत भेटत नाही यासाठी तालुका पातळीवर कार्यकर्त्यांनी सातत्याने समन्वय ठेवून एकत्र बसले पाहिजे उपक्रम राबवून समाज संघटनेसाठी ज्येष्ठांनी बळ द्यावे व मार्गदर्शन करावे समाजाच्या अनेक गोष्टींबद्दल कार्यकर्त्यांना त्यांनी चांगले सुनावले प्रत्येकाबद्दल सहानुभूती आपुलकीच्या भावना सर्वांनी जपाव्यात व्यसनापासून दूर राहा कामे वेळेत करा मंदिरासाठी भरीव अशी आर्थिक मदत त्यांनी केली व समाज बांधवांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केलेकार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्ती सूर्यवंशी यांनी केले बाळासाहेब वाकचौरे प्रणाली धुमाळ प्रशांत धुमाळ ईश्वर वाकचौरे वसंतराव मानकर यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केली सूत्रसंचालन प्राचार्य किरण भागवत यांनी केले आभार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले
गेली दोन हजार दहा पासून बंद पडलेल्या कामाला कालच्या कार्यक्रमामुळे गती प्राप्त झाल्याचे किरण भागवत यांनी स्पष्ट केले हजार ते बाराशे उपस्थितांच्या मुळे कार्यक्रमाची शोभा वाढली सर्वच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तन मन धनाने कार्यरत राहून गेली महिनाभरापासून कार्यक्रमाचे नियोजन केले होते सर्वांना प्रतिभा सूर्यवंशी यांच्या कुटुंबाच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला विश्वकर्मा प्रतिमेची पूजन व पूजेसाठी सौ गायत्री भालेराव व श्रीपाद भालेराव हे पती-पत्नी बसले होते




