अकोले येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहिल्यानगर तर्फे बहुविभागीय तक्रार निराकरण शिबिर*
सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आवाहन*

अकोले (सुदिन न्यूज)- सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, जिल्हा सत्र न्यायालय, अहिल्यानगर यांच्या माध्यमातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने बहुविभागीय तक्रार व प्रलंबित कामे निराकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ज्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे तसेच जे नागरिक त्यांच्या अडचणी घेऊन शासकीय कार्यालयापर्यंत पोचू शकत नाही किंवा कोणत्या कार्यालयातून जाऊन तक्रार नोंदवावी किंवा आपलं म्हणण मांडवे अशा नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे .
🔴या शिबिरामध्ये एकूण 25 पेक्षा जास्त विभागांचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात येणार असून, संबंधित विभागाचे अधिकारी/कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपापल्या विभागाशी संबंधित नागरिकांच्या अडचणी, तक्रारी व प्रलंबित कामांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
⭐ *यामध्ये विविध योजना,श्रावण बाळ योजना ,निराधार योजना ,रेशन कार्ड , नरेगा कार्ड ,घरकुल विभाग हप्त्याबाबत, नोंदणी, प्रमाणपत्रे, महसूल, पोलीस, बँकिंग, विमा, पेन्शन, फॉरेस्ट , वीज महामंडळ , सामाजिक सुरक्षा इत्यादी स्वरूपाची कामे/प्रकरणे समाविष्ट असू शकतात.*
⭐शिबिराचा मुख्य उद्देश विविध शासकीय विभागांशी संबंधित तुमच्या प्रत्यक्ष व्यवहारातील समस्या व प्रलंबित प्रशासकीय/शासकीय कामांचे त्वरित व समन्वयातून निराकरण करणे हा आहे.
📆 *शिबिराची तारीख व ठिकाण*:
*दिनांक : *22 फेब्रुवारी 2026*
*ठिकाण : *अकोले, जिल्हा अहिल्यानगर*
📝 *अर्ज कसा भरावा व कुठे सादर करावा?*
1.इच्छुक नागरिकांनी “जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर” यांनी दिलेला अर्जाचा नमुना (फॉर्म) आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातून घ्यावा.
2.भरलेले अर्ज पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावेत किंवा थेट पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय किंवा अकोले न्यायालय येथेही भरून सादर करता येतील.
🔴अर्ज भरताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, समस्या/प्रलंबित कामाचा प्रकार व संबंधित विभाग याची माहिती स्पष्टपणे लिहावी.
हे शिबिर मुख्यतः विविध विभागांशी संबंधित प्रलंबित कामे व तक्रारी मार्गी लावण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे.🔴 तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी अर्ज भरून शिबिराचा लाभ घ्यावा, तसेच ज्यांना माहिती किंवा मदतीची गरज आहे अशा नागरिकांना अर्ज भरणे व सादर करणे यामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे




