E-PaperEducationalमहाराष्ट्रलोकल न्यूज़

श्री. ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाची मुंबई उच्च न्यायालय व आर्थर रोड तुरुंग येथे शैक्षणिक सहल

संगमनेर (सुदिन न्यूज नेटवर्क) : संगमनेर येथील श्री. ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालय व आर्थर रोड तुरुंग या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडली. सदर सहल शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मणियार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली होती.

या शैक्षणिक सहलीत एकूण ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून त्यामध्ये ४० मुले व ४० मुली यांचा समावेश होता. सहलीचे यशस्वी नियोजन व नेतृत्व सहाय्यक प्राध्यापक देवयानी निकम, सृष्टी देशमुख, डॉ. कपिल चौरपगार, डॉ. सचिन पठारे तसेच शिक्षकेतर सहकारी श्री. नामदेव शिरपे यांनी केले.

सहलीदरम्यान प्रथम विद्यार्थ्यांनी आर्थर रोड तुरुंगास भेट दिली. विद्यार्थ्यांचे दोन गट करून सुरक्षेच्या दृष्टीने एकामागोमाग एक अशा पद्धतीने तुरुंगातील विविध विभागांची माहिती देण्यात आली. तुरुंग अधीक्षक श्री. टोणगे साहेब यांनी तुरुंगातील कार्यपद्धती, कैद्यांचे जीवन, प्रशासन व सुरक्षाव्यवस्था याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन केले.

त्यानंतर दुपारी मुंबई उच्च न्यायालयास भेट देण्यात आली. दहा-दहा विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना विविध न्यायालयीन कक्षांना भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाज जवळून पाहिले. तसेच उच्च न्यायालयाच्या ग्रंथालय व संग्रहालयास भेट देऊन न्यायव्यवस्थेच्या इतिहासाबाबत अभ्यासपूर्ण माहिती घेतली.

सहलीच्या शेवटी विद्यार्थ्यांना गेट वे ऑफ इंडिया येथे भेट देण्याची संधी मिळाली. एकूणच ही सहल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक, अनुभवसमृद्ध व संस्मरणीय ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!