व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट, संगमनेरचा JEE Main 2026 मध्ये दणदणीत यश*

संगमनेर — देशभरातील सुमारे *१३ लाख ५५ हजार* विद्यार्थ्यांनी दिलेल्या अत्यंत स्पर्धात्मक अशा *JEE Mains 2026* प्रवेश परीक्षे च्या पहिल्या प्रयत्नात संगमनेर येथील व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
JEE (Joint Entrance Examination) ही भारतातील सर्वात कठीण व प्रतिष्ठेची अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा मानली जाते. देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालये, विशेषतः IIT, NIT व इतर केंद्रीय संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या परीक्षेतील उच्च पर्सेंटाइल अत्यंत महत्त्वाचा असतो. लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी वर्षानुवर्षे कठोर तयारी करतात, त्यामुळे या परीक्षेत यश मिळवणे ही मोठी शैक्षणिक कामगिरी मानली जाते.
संस्थेची विद्यार्थिनी *सायली कुलकर्णी* हिने तब्बल *99.93%ile* पर्सेंटाइल मिळवत संस्थेचे व संगमनेर शहराचे नाव उज्ज्वल केले. विषयानुसार तिचे गुण विशेष उल्लेखनीय असून केमिस्ट्री – 99.97%ile पर्सेंटाइल, गणित – 99.88%ile पर्सेंटाइल आणि फिजिक्स – 99.36%ile पर्सेंटाइल असे प्रभावी गुण तिने मिळवले आहेत. तसेच *मोहित सोलंकी* याने *96.13%ile* पर्सेंटाइल तर *राशी बाहेती* हिने *93.12%ile* पर्सेंटाइल गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. याशिवाय संस्थेतील आणखी ५ ते ७ विद्यार्थ्यांनी 85%ile पर्सेंटाइलपेक्षा अधिक गुण मिळवत सातत्यपूर्ण गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे.
या यशामागे संस्थेच्या अनुभवी व समर्पित शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत, तसेच अभ्यासाची वैज्ञानिक पद्धत हे महत्त्वाचे घटक ठरले. संस्थेचे संचालक डॉ. हर्षवर्धन गुंजाळ यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि गुणवत्तेला प्राधान्य देणाऱ्या शैक्षणिक धोरणांमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा, प्रेरणा व उत्कृष्ट मार्गदर्शन मिळत असल्याचे मत पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था सातत्याने गुणवत्तापूर्ण निकाल देत प्रगतीपथावर आहे.
व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटने अल्पावधीतच गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियोजनबद्ध अभ्यासक्रम आणि विद्यार्थीकेंद्री मार्गदर्शनाच्या जोरावर स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, या निकालाने संस्थेच्या यशाची आणखी एक सुवर्णपानात नोंद झाली आहे.




