Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
टॉप न्यूज़देशमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षणशेतीसंगमनेरसहकार

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा

गुरुवारी राजहंस दूध संघ तर शुक्रवारी थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा

संगमनेर ( प्रतिनिधी ) संपूर्ण देशासाठी सहकाराचे आदर्श मॉडेल ठरलेल्या अमृत उद्योग समूहामधील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूल व कृषीमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026 ते 20 सप्टेंबर 2026 या कालावधीत कारखाना कार्यस्थळावरील कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारती समोरील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार आहे.थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांवर संगमनेर मधील अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांचे कामकाज हे देशासाठी उत्तम मॉडेल ठरले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या सर्व सहकारी संस्थांमधून तालुक्याच्या ग्रामीण विकासासह शेतकरी, उत्पादक,नागरिक,महिला, व्यापारी, कामगार या सर्वांचा विकास साधला जात असून या सहकारी संस्थांमुळे तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.

या आदर्शवत सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा 17 सप्टेंबर 2026 ते 20 सप्टेंबर 2026 या काळात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारती समोरील अमृतेश्वर मंदिराजवळील प्रांगणात मा.महसूल व कृषीमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात,मा.आ.डॉ.सुधीर तांबे व तालुक्यातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. गुरुवार 17 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वा. संगमनेर सहकारी शेतकी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन संपतराव डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सहकारी बँक संगमनेर मार्केट यार्ड शाखा सह्याद्री शाळेजवळ होणार आहे. तर दुपारी 1 वा. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर अमृतेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात होणार आहे.

शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1 वा. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा विद्यमान चेअरमन माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

शनिवारी सकाळी 11 वा.वडगाव पान येथील कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार येथे सभापती शंकरराव खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.

तर रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता अमृतवाहिनी बँक येथील हॉलमध्ये गरुड कुक्कुटपालन सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा राजेंद्र कडलग यांच्या अध्यक्षतेखाली तर 10.30 वाजता हरिश्चंद्र फेडरेशन पाणीपुरवठा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन राजेंद्र गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

रविवारी दुपारी 1 वा. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुधाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली अमृतेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात होणार आहे.

या सर्व वार्षिक सर्वसाधारण सभांना आमदार सत्यजित तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, ॲड.माधवराव कानवडे, बाजीराव पा.खेमनर, सौ.दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे यांच्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी सभासद व उत्पादक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले, दूध संघाचे व्हा.चेअरमन राजेंद्र चकोर, बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे, शेतकी संघाचे व्हा.चेअरमन सुनील कडलग, मार्केट कमिटीचे उपसभापती गीताराम गायकवाड, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह थोरात सहकारी साखर कारखाना कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक, शेतकी संघ, हरिश्चंद्र फेडरेशन, गरुड कुक्कुटपालन या सर्व सहकारी संस्थांच्या संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!