टॉप न्यूज़डॉ. जयश्रीताई थोरातधर्ममहाराष्ट्रयुवाशिक्षणसहकार

आता धार्मिकतेचे राजकारण नको तर विकासाचे हवे–विवेकानंद पाटील

संगमनेर मधील तरुणांशी साधला संवाद

संगमनेर (प्रतिनिधी)–आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर काम करत असून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मानतो. चांगल्या राजकारणासाठी चांगली लोक राजकारणात येणे गरजेचे आहे. याचबरोबर चांगली लोक निवडून देणे गरजेचे आहे. धार्मिकतेचे राजकारण आता नको असून जनतेला विकासाचे राजकारण हवे आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विकासातून संगमनेर तालुका उभा केला आहे. हे युवकांनी विसरू नये असे प्रतिपादन विवेकानंद पाटील यांनी केली आहे.

सुदर्शन निवासस्थानी पुणे येथील एमपीएससी आंदोलनातील नेतृत्व करणारे विवेकानंद पाटील यांनी युवकांशी संवाद साधला यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, निखिल पापडेजा, विजय राहणे, वैष्णव मुर्तडक, हर्षल राहणे, डॉ. विजय पवार, गौरव डोंगरे ,सौरभ उमरजी ,रामेश्वर पानसरे ,अविनाश शिंदे, प्रीतम साबळे ,विकास पवार, ओंकार शेटे, दीपक शिंदे, डॉ संदीप गोरडे ,अजित डोंगरे, मंगेश पावशे, संदीप ठोंबरे ,अमित गुंजाळ, सुभाष दिघे, ऋषिकेश शिनारे, रमेश वरपे ,गणेश जोंधळे, संदीप थिटे ,शुभम काळे, श्रीकांत सांगळे, अमोल शिरसागर ,अमर सातपुते, अंबादास गुंजाळ, अमोल दिघे, निलेश गुंजाळ ,शिवाजी गुंजाळ, सचिन गोरडे, सुभाष खर्डे, ऋतिक राऊत, प्रशांत कदम, अनिल राऊत , योगेश खेमनर ,मोहसीन शेख राम अरगडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना विवेकानंद पाटील म्हणाले की, आपण कोणत्याही पक्षाचे नसून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर काम करत आहोत. राजकारणामध्ये चांगल्या लोकांची गरज आहे. फक्त राजकारणी लोकांना नाव ठेवून चालणार नाही तर चुकीचे वागणाऱ्यांना बाजूला करावे लागणार आहे. तरुणांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजे. याचबरोबर समतेचा विचार घेऊन एकमेकांना सहाय्य केले पाहिजे.नेत्यांचे अंधभक्त झाले तर तो नेता अल्पजीवी ठरतो. म्हणून उघड्या डोळ्यांनी पहा सुज्ञ पणे प्रश्न विचारा सुसंस्कृत राजकारणाची परंपरा जपा समाजाला बर ऐकायची सवय लागली आहे आता ते खरं ऐकत नाहीत. जनता सुज्ञ असेल तर सुज्ञ प्रतिनिधी निवडून येतात मात्र चुकीचे लोक जास्त झाले तर चुकीचे प्रतिनिधी निवडून जातात.सध्या राजकारण शहाणे लोकांच्या नाहीतर अति शहाणे लोकांच्या हाती गेले असल्याची टीका त्यांनी केली असून काही विशिष्ट पक्षांचे आयटी सेल ही 45 पैसे प्रमाणे टीका करण्याचे काम करत आहे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका टीका करणारे टीका करतील तुम्ही काम करा एक दिवस तुमचा येईल असा सल्लाही त्यांनी युवकांना दिला

याचबरोबर काँग्रेस पक्षाने 70 वर्षांमध्ये देश उभा केला तुम्ही बारा वर्षात काय केले असा सवाल करताना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 40 वर्षात संगमनेर तालुका राज्याला दिशादर्शक केला आता पुढच्या लोकांनी दोन वर्षात काय केले ते त्यांना विचारा असा सल्लाही तरुणांना दिला. याचबरोबर नव्या पिढीला धार्मिकतेचे राजकारण नको तर विकासाचे राजकारण हवे आहेत असे ते म्हणाले

तर मा मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पुणे येथील एमपीएससी आंदोलनाला विवेकानंद पाटील यांनी धार आणली विद्यार्थ्यांचे प्रश्न अत्यंत परखडपणे मांडले. सरकारला विचार करायला भाग पाडले. सध्या लोकशाही संकटात आली आहे हरियाणामध्ये 750 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मात्र तरीही जनतेला त्याचे काही वाटत नाही. कोल्हापूर मधील गोकुळ दूध संघाच्या बाबत अत्यंत चुकीचे झाले आहे लोकशाही धोकात आली आहे झेन झी ला आता धार्मिकता मान्य नाही. सध्या दैवत वाढत चालला असून धार्मिकतेच्या नावावर राजकारण केले जात आहे 2014 नंतरचा कालखंड हा इतिहासातील काळा कालखंड म्हणून गणला जाईल असे सांगताना या कालखंडात राहुल गांधी हे एकटे लढत आहेत त्यांची इतिहास नोंद घेईल असेही माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
डॉ जयश्री ताई थोरात म्हणाल्या की राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्व संत समाज सुधारक यांचा समतेचा आणि मानवतेचा विचार घेऊन संगमनेर तालुक्यात आपण काम करत आहोत. हा विचार आपल्याला जोपासायचा आहे अडचण येतील परंतु अडचणीच्या काळात खंबीरपणे उभे राहून समतेचा विचार आपण पुढे नेऊ असे त्या म्हणाल्या,
यावेळी तालुक्यातील विविध युवकांनी विवेकानंद पाटील यांच्याशी प्रश्न उत्तराद्वारे संवाद साधला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निखिल पापडेजा यांनी केले.

युवकांनी मोबाईल पेक्षा वर्तमानपत्र व पुस्तके वाचा
सध्या तरुणाई सोशल मीडियावर टिकून आहे. खरे काय खोटे काय पाहत नाही कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही धार्मिक गोष्टी पुढे पाठवल्या जात आहे हे सगळे चुकीचे आहे. मोबाईलवर असणारी मंडळी वैचारिक नाही. म्हणून विचारांमधून स्वतःचे स्थान बळकट करण्याकरता मोबाईल नव्हे तर दररोजची वर्तमानपत्र, त्यामधील अग्रलेख ,घडामोडी किंवा पुस्तके वाचा . त्यातून तुम्ही खरे समृद्ध व्हाल असा सल्ला विवेकानंद पाटील यांनी युवकांना दिला

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!