संतांच्या विचारांची आणि भक्तीची परंपरा अखंड सुरू राहो; आ खताळ
निमोन येथे आ. खताळ यांनी घेतले निवृत्तीनाथ महाराज पालखीचे दर्शन

संगमनेर : (सुदिन न्यूज नेटवर्क)
. “संतांच्या विचारांची आणि भक्तीची ही पवित्र परंपरा अखंड अशीच पुढे चालत राहो, समाजात प्रेम, बंधुभाव, सद्भावना आणि अध्यात्मिक संस्कार रुजत राहोत, अशी प्रार्थना आमदार अमोल खताळे यांनी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी केली,”
संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरहून त्र्यंबकेश्वरकडे परतीच्या प्रवासात असताना निमोण येथे श्री. मारुती घुगे यांच्या निवास स्थानी या पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी निमोणचे सरपंच संदीप देशमुख यांनी उपस्थित राहून त्र्यंबकेश्वरचे संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पवित्र पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतला.
याप्रसंगी आमदार अमोल खताळ यांना पालखीचे सारथ्य करण्याचे भाग्य लाभले. वारकरी संप्रदायाच्या या पवित्र आणि शतकानुशतकांच्या भक्तीपरंपरेत सहभागी होण्याचा अनुभव मनाला अपार समाधान देणारा आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन संतांच्या पवित्र विचारांचा आणि भक्तीमय परंपरेचा अनुभव घेणे ही आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरणामध्ये निर्माण झाले होते. वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
इतक्या वर्षात प्रथमच आमदार अमोल खताळ यांनी संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज पालखीचे नाशिक जिल्ह्या तून अहिल्यानगर जिल्ह्यात स्वागत केलेच परंतु पंढरपूरहुन त्र्यंबकेश्वरला पुन्हा परतीला जाताना आमदार अमोल खताळ यांनी पालखीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.





