अकोले तालुक्यात प्रशासनाने अतिवृष्टीचे पंचनामे त्वरीत करावेत व तातडीने नुकसान भरपाई मिळावी— ग्राहक पंचायत
अकोले तहसील प्रशासनाने व तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांचे त्वरीत अतिवृष्टीचे पंचनामे करावेत
अकोले (सुदिन न्यूज नेटवर्क) अकोले आदिवासी भागामध्ये अतिवृष्टीचे पंचनामे त्वरीत करावे व त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याबाबतचे निवेदन अकोल्याचे तहसिलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांना दिल्याची माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलीक, सचिव राम रुद्रे, भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, जुलै महिन्यात व सध्या अकोले तालुक्यात गेली आठ दहा दिवसा पासून सातत्याने जोरदार पाऊस पड



त असल्याने व बऱ्याच भागात अतिवृष्टी झाल्याने अकोल्याच्या पश्चिम आदिवासी भागासह शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अकोले तहसील प्रशासनाने व तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांचे त्वरीत अतिवृष्टीचे पंचनामे करावेत अशी मागणी अकोले तालुका ग्राहक पंचायतच्या वतीने प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाव्दारे केली आहे.
अकोले तालुक्यातील आदिवासी शेतकरी पाऊस उशिरा झाल्याने भात पिक लावण्यात उशिर झाला पाऊस उशिरा झाल्याने शेतकऱ्यांनी भात पिकाची व इतर्स पिकाची पेरनी लागवड केली मात्र काही दिवस पावसाने उघडदीप दिली मात्र पुन्हा एकदा आठ ते दहा बारा दिवसापासून सतत धार पाऊसाने शेतकरी मेटाकुटीस आला.
पाऊसाच्या सातत्याने भात पिके पाण्याखाली गेली आहे तर आदिवासी भागातील भात शेतीचे बांद, व शेती वाहून गेल्याने शेतीच नष्ट झाली. यामुळे आदिवासी शेतकरी वर्ग बेचैन झाला आहे. शेतकऱ्यांनी एकमेकाची सावड करून भाताची लागवड केली. त्यात भात वाहून गेल्याने वर्षभराच्या भात शेतीचे उत्पन्नावर अवलंबून असते तेच पिके न शेती वाहून गेल्याने, हरिश्चंद्रगड, पाचनई, साम्रद, घाटघर, रतनवाडी फोफसंडी, पांजरे, उडदावने, वारंघुशी, तिरडा, पाचपट्टा, बिताका कुमशेत, आदी भागां मध्ये शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.
अकोले प्रशासनाने यांची त्वरीत दखल घेऊन पंचनामे करावेत. अनेक भागात शेतीसह दरड, झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान झाले, जनावरे दगावली अधिकाऱ्यांनी यांची त्वरीत दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, अध्यक्ष दत्ता शेनकर, कार्याध्यक्ष महेश नवले, सचिव राम रुद्रे, भाऊसाहेब वाकचौरे, अनंत घाणे, गंगाराम धिंदळे, सयाजी आस्वले, दत्तात्रय मुठे, मोहन मुंढे,सुरेश गभाले, अशोक उघडे, महादू उघडे, लक्ष्मण उघडे, माधवराव तिटमे, रामदास पवार, गणपत थिगळे, ज्ञानेश्वर पुंडे, प्रदीप हासे, रामहरी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे, आदींची नावे आहे
निवेदनाच्या प्रती जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, तालुका कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहे.
पांजरे येथे ढगफुटी झाली त्यामध्ये तेथील शेतकरी लक्ष्मण उघडे, सोमा उघडे, बुधा उघडे, अशोक उघडे, ढवळा उघडे, लक्ष्मण सयाजी उघडे, महादू उघडे आदी शेतकऱ्यांचे शेती, शेत भुई सपाट झाले भात लागवड केलेली शेती व रोपे सर्व भात शेती भूस्खलनात नष्ट झाली, सर्व पाण्याने वाहून गेली व शेत दिसेनासे झाले.
जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलीक, सचिव राम रुद्रे,


