Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
टॉप न्यूज़राज्यलोकल न्यूज़संगमनेर

संगमनेर शहर व तालुक्याच्या सामाजिक विकासासाठी ५५ लाखांचा निधी मंजूर

संत रोहिदास भवन व दोन सभामंडपांच्या उभारणीला मिळणार गती; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

संगमनेर | सुदिन न्यूज नेटवर्क

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत संगमनेर शहर व तालुक्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकूण ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. या निधीसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. मंजूर निधीनुसार संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीत संत रोहिदास भवनाच्या उभारणीसाठी २५ लाख रुपये, घुलेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण संस्थेच्या परिसरात सभामंडप उभारण्यासाठी १५ लाख रुपये, तसेच पठारभागातील खंदरमाळ गावठाणातील संत रोहिदास मंदिरासमोरील सभामंडपासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या तिन्ही विकासकामांमुळे सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

संत रोहिदास भवनाच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करता येणार आहे. तसेच घुलेवाडी आणि खंदरमाळ येथील सभामंडपांमुळे स्थानिक नागरिकांना विविध कार्यक्रम, बैठका, धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होणार आहेत. या कामांमुळे परिसराच्या विकासाला चालना मिळण्यासोबतच सामाजिक ऐक्य अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आमदार खताळ यांनी सामाजिक विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध योजनांचा लाभ संगमनेर शहर व तालुक्याला मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले असून, आगामी काळातही विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून मंजूर झालेल्या या विकासकामांमुळे संत रोहिदास समाजासह सर्वसामान्य नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. संत रोहिदास भवन आणि सभामंडपांच्या उभारणीमुळे समाजोपयोगी उपक्रमांना चालना मिळेल, सामाजिक एकात्मता अधिक दृढ होईल आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल. संगमनेरच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांमधून जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न यापुढेही कायम राहील.

आमदार अमोल खताळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!