अहिल्यानगरटॉप न्यूज़डॉ दिपाली पानसरेदेशधर्मनीलम खताळलोकल न्यूज़संगमनेर

संगमनेरात महिलांचे शिस्तबद्ध पथसंचलन

आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांचा महिला स्वयंसेविकांसमवेत सहभाग

संगमनेर, प्रतिनिधी : विजयादशमीचे पावन पर्व आणि राष्ट्र सेविका समितीच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने राष्ट्र सेविका समिती, उत्तर अहिल्या नगर जिल्ह्याच्या वतीने संगमनेर येथे सघोष पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या पथसंचलना मध्ये आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी तथा आदिशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलम खताळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाहीका शैला देशपांडे आणि उमा गौरी विमान्स ग्लोबल फाउंडेशन अध्यक्ष डॉ दिपाली पानसरे यांच्यासह शेकडो महिला स्वयं सेविकांसमवेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

राष्ट्र सेविका समितीच्या महिला स्वयंसेविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने पुणे नाका येथील शारदा शाळा येथून सुरू झालेले पथसंचलन माळीवाडा चावडी मेनरोड सय्यद बाबा चौक तेलीखुंट चंद्रशेखर चौक रंगार गल्ली नगरपालिका मार्गे पुन्हा शारदा विद्यालय या पथसंचनालाची सांगता झाली या उपक्रमातून महिलांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी, संघटनात्मक शिस्त आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला.

राष्ट्र सेविका समितीच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण होणे हा समितीच्या कार्यप्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. महिलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेची भावना रुजविण्याच्या उद्देशाने समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. या ऐतिहासिक पर्वाच्या निमित्ताने आयोजित पथसंचलनातून समितीच्या कार्याचा आणि महिला शक्तीच्या संघटित सामर्थ्याचा परिचय घडला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!