
संगमनेर/ प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बिरोबा महाराज व मोठेबाबा देवस्थानच्या यात्रोत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी देवस्थानाला भेट देऊन बिरोबा महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान परिसरात सभामंडप उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करून पुढील वर्षी नव्याने उभारलेल्या सभागृहात यात्रोत्सव साजरा होईल, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.
सुकेवाडी येथील बिरोबा महाराज व मोठेबाबा महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी देवस्थानाला भेट दिली. यावेळी सुकेवाडीचे माजी सरपंच तथा शिवसेनेचे नेते रेवनाथ शिंदे, भारत शिंदे, भागवत शिंदे, केशव जाधव, माजी सरपंच गोरक्षनाथ सातपुते, उपसरपंच सुभाष कुटे, विलास महाराज कुटे, श्याम राहणे, निलेश गुंजाळ, संकेत खुळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होत
यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, सुकेवाडी येथील बिरोबा महाराज व मोठेबाबा देवस्थान हे धनगर समाजाचे जागृत देवस्थान असून, या देवस्थानावर आपली पूर्वीपासून श्रद्धा आहे. यापूर्वीही आपण बिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी सातत्याने येत होतो. मात्र, आता तालुक्याचा आमदार म्हणून या ठिकाणी आलो आहे. ग्रामस्थांनी केलेली सभामंडप उभारणीची मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. यासाठी सकारात्मक प्रयत्न करून पुढील वर्षी नव्याने उभारलेल्या सभागृहात यात्रोत्सव साजरा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बिरोबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त संगमनेर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या सर्व भाविकांच्या मनोकामना बिरोबा महाराज निश्चितच पूर्ण करतील. यंदा तालुक्यावर दुष्काळाचे मोठे संकट ओढवले असून, या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी बांधवांना शक्ती द्यावी, अशी प्रार्थनाही आमदार अमोल खताळ यांनी बिरोबा महाराजांच्या चरणी केली.

लोहारेच्या रस्त्याचे काम दिवाळीनंतर पूर्ण करणार : संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील बिरोबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी देवस्थानाला भेट देऊन दर्शन घेतले. तांडा योजनेतून त्यांच्या पाठपुराव्यामुळे येथील रस्त्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम लवकर सुरू करून पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. त्यावर दिवाळीनंतर रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असा विश्वास आमदार खताळ यांनी लोहारे येथील ग्रामस्थांना दिला.





