अहिल्यानगरटॉप न्यूज़बाळासाहेब थोरातलोकल न्यूज़शेतीसहकार
थोरात कारखान्याच्या वतीने अपघातात मृत सभासदांच्या वारसांना 2 लाख रुपयांची मदत
चार मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांचा धनादेश

संगमनेर ( प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक व कामगार यांचे कायम हित जोपासले जात असून कारखान्याने सभासदांचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा विमा उतरवला आहे या अंतर्गत अपघातात मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना दोन लाख रुपयांचा धनादेश राज्याचे मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीत आंबी खालसा येथील कै.सुखदेव नामदेव गाडेकर, राजापूर येथील माधव हासे, व वडगाव पान येथील मनाजी रेवजी थोरात यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेशाचे वितरण त्यांच्या वारसांना करण्यात आले यावेळी मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कारखान्याची व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, नाना शहाजी दिघे यांच्यासह विविध ग्रामस्थ उपस्थित होते.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर कारखाना व अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांची वाटचाल सुरू आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने कायम तालुक्याच्या विकासाचे हृदय म्हणून काम करताना मोठे योगदान दिले आहे. सातत्याने चांगला भाव देण्याबरोबर शेतकरी सभासद व कामगार यांचे हित जोपासले आहे. कारखान्याच्या उत्कृष्ट कामकाजामुळे कार्यक्षेत्राबाहेरील सभासदांचाही कारखान्यावर मोठा विश्वास राहिला आहे.कारखान्याने सभासदांचा दोन लाखांपर्यंत चा विमा उतरवला असून अपघातामध्ये निधन पावलेल्या सभासदांच्या वारसांना ही रक्कम दिली केली आहे
कारखान्याने सभासदांबरोबर आमच्या कुटुंबीयांची कायम काळजी घेतली असून सन्मानाने आणि आदराने वागणूक दिली आहे. पैशापेक्षा आत्मीयता आणि जिव्हाळा महत्त्वाचा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिवाराने हे संस्कार कायम जपले असल्याचे हासे परिवाराने म्हटले आहे.तर कारखाना कायम आमच्या पाठीशी उभा राहिला. अशी भावना वडगाव पान व आंबी खालसा येथील थोरात व गाडेकर कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.



