Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
क्राइमटॉप न्यूज़देशधर्ममहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़संगमनेर

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल 

बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार घारगाव पोलिसांची कारवाई

संगमनेर : (सुदिनन्यूज नेटवर्क)
अल्पवयीन मुलगी असल्याची संपूर्ण माहिती असतानाही तिचा बालविवाह लावून दिल्याप्रकरणी घारगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे बालविवाहास आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, अशा प्रकारांना कोणतीही सहनशीलता दाखविली जाणार नसल्याचा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठारभागातील एका कार्यालयात संबंधित बालविवाह पार पडला. विवाह होत असलेली मुलगी ही १८ वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याची स्पष्ट माहिती संबंधितांना असतानाही कायद्याचे उल्लंघन करून हा विवाह लावून देण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी सागर रसाळ यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीच्या आधारे घारगाव पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून कारवाई केली.
या प्रकरणात मुलाकडील तिघे आणि मुलीकडील दोघे अशा एकूण पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ मधील कलम ९, १० व ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. डी. एम. चौधरी करीत आहेत.

बालविवाह हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने जनजागृतीसह कठोर कारवाई केली जात असल्याचे या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!