कोकणगावग्रामपंचायतटॉप न्यूज़लोकल न्यूज़शेतीसंगमनेर

788

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष; महिलांनी केला संताप व्यक्त

संगमनेर, प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव -शिवापूर परिसरात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत गावात नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच प्रत्येक प्रभागातील पाणी सोडण्याचे वेळापत्रक जाहीर करावे, जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा कोकणगाव शिवापूर येथील ग्रामस्थांसह महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

सध्या पाऊस नसल्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे नदीला पाणी असतानाही ग्रामपंचायत प्रशासन पाण्याचे योग्य नियोजन करत नाही त्यामुळे पाणी टंचाईचाला आम्हा सर्व ग्रामस्थांसह महिलांना सामोरे जावे लागत आहे गावाला पाणीपुरवठा कधी होणार, किती वेळ पाणी मिळणार आणि कोणत्या प्रभागात कोणत्या दिवशी पाणी सोडले जाणार, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने ग्रामस्थां मध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे .

पाण्याची समस्या गंभीर होत असताना मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस उपाययोजना करत नाही तसेच पाणीपुरवठ्याचे कुठलेच वेळापत्रक ग्रामपंचायत प्रशासनाकडे नाही त्यामुळे त्यांनी पाणी सोडण्याचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे अशी मागणी ग्रामस्थ आणि महिलांनी केली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!