टॉप न्यूज़बाळासाहेब थोरातलोकल न्यूज़शेतीसहकार

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या वतीने साखर वाटप कार्यक्रम जाहीर

कामगारांना 20 टक्के बोनस व तीन दिवसांचे सानूगृह अनुदान देण्यात येणार आहे......!व्हाईस चेअरमन पांडुरंग पा.घुले,

संगमनेर ( प्रतिनिधी)–काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा राज्याचे मा. महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम शेतकरी सभासद ऊस उत्पादक व कामगार यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. दीपावलीच्या निमित्ताने शेअर्स पूर्ण असणाऱ्या सभासदांना 2 नोव्हेंबर 2026 ते 4 नोव्हेंबर 2026 या काळात मोफत 30 किलो साखर देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे

याबाबत अधिक माहिती देताना पांडुरंग घुले म्हणाले की, थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीनिमित्त कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 200 रुपये प्रति टन प्रमाणे अनुदान देण्यात आले आहे याचबरोबर कामगारांना 20 टक्के बोनस व तीन दिवसांचे सानूगृह अनुदान देण्यात येणार आहे.
तर दरवर्षीप्रमाणे 30/09/2026 अखेर ज्या सभासदांचे शेअर्स मंजूर व पूर्ण आहेत अशा सभासदांना 30 किलो मोफत साखर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे . ज्या सभासदांची शेअर्स रक्कम अपूर्ण आहे त्यांची यादी गावातील सेवा सोसायट्यांमध्ये किंवा कारखान्याच्या गट कार्यालयात उपलब्ध आहे.
साखर गोडाऊन क्रमांक 12 व 13 मधून सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 2026 ते 4 नोव्हेंबर 2026 या काळात सभासदांना मोफत 30 किलो साखर वाटप केली जाणार आहे साखर वाटपासाठी सभासदांनी ओरिजनल ओळखपत्र आणले गरजेचे आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ओळखपत्र काढलेले नाही. अशा सभासदांनी साखर घेण्यासाठी येताना एक फोटो व आधार कार्ड घेऊन यावा.
तरी सर्व सभासद बंधू-भगिनी साखर वाटप कार्यक्रमाप्रमाणेच साखर घेऊन जावी व साखर वाटपाबाबत कारखान्यास सहकार्य करावे असे आवाहन सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!