अहिल्यानगरटॉप न्यूज़देशलोकल न्यूज़शिक्षणशेतीसहकार

भारताच्या मा. पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना शनिवारी अमृत उद्योग समूहाच्या वतीने अभिवादन

करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.

संगमनेर ( प्रतिनिधी)–भारताच्या माजी पंतप्रधान तथा आयर्न लेडी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या 42 व्या स्मृतिदिनानिमित्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने शनिवार दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8.30 वा. शक्तीस्थळ अमृतनगर येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे देशाच्या उभारणीत मोलाचे योगदान आहे. पाकिस्तानला धडा शिकवत बांगलादेशची निर्मिती करणाऱ्या इंदिरा गांधी यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणास्त्रोत असलेल्या इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन दरवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो यानिमित्त वेगवेगळ्या मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली जातात. यावर्षी शनिवार दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात ,मा आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी ॲड माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, बाबासाहेब ओहोळ,सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, इंद्रजीत भाऊ थोरात,रामहरी कातोरे ,राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलक ,अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, सौ.अर्चना बालोडे, सुरेश झावरे ,निखिल पापडेजा, हैदर अली, गौरव डोंगरे, विश्वासराव मुर्तडक, गणपतराव सांगळे, प्रा. बाबा खरात, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, सौ प्रमिला अभंग, सौ निर्मलाताई गुंजाळ, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 
तरी या अभिवादन कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक नागरिक व महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!