एका २५ वर्षीय तरुणाचा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.
प्रवरानदीवर धाव घेत नीलम खताळ यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

संगमनेर | सुदिन न्यूज नेटवर्क
संगमनेर शहरातील केशवतीर्थ परिसरात प्रवरा नदीत पोहण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या एका २५ वर्षीय तरुणाचा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. पोलीस, नगरपालिका प्रशासन तसेच बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शोधमोहीम अधिक प्रभावी पणे राबविण्याच्या सूचना दिल्या.
पारेगाव बुद्रुक येथील ऋषिकेश नवनाथ गडाख(वय २५) हा आपल्या मित्रांसोबत केशवतीर्थ परिसरातील प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेला होता. नदीतील पाण्याचा वेग अचानक वाढल्याने तो प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस, नगरपालिका प्रशासन आणि बचाव पथक घटना स्थळी दाखल झाले. नदीच्या पात्रात बेपत्ता झालेल्या ऋषिकेशचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवरती शोध मोहीम सुरू करण्यात आली.दरम्यान सौं नीलम खताळ यांनी घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नदीतील पाण्याचा वाढता वेग आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शोधकार्य अधिक वेगाने व नियोज नबद्ध पद्धतीने राबविण्याचे निर्देश दिले.शोधमोहीमेतमध्ये कोणताही हलगर्जी होऊ नये तसेच प्रत्येक शक्य त्या ठिकाणी शोधकार्य सुरू ठेवावे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी नीलम खताळ यांनी बेपत्ता ऋषिकेश गडाख यांच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची आस्थेने विचार पूस केली. या कठीण प्रसंगी धीर न सोडण्याचे आवाहन करत प्रशासना कडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पोलीस, नगरपालिका प्रशासन अन स्थानिक बचाव पथकाच्या समन्वयातून शोध मोहीम सुरू असून, बेपत्ता तरुणाचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशा सूचना दिल्या या दुर्दैवी घटनेमुळे संगमनेर शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे




