Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
टॉप न्यूज़महाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़संगमनेर

विकासाची वाटचाल थांबणार नाही : आमदार खताळ

मुख्यमंत्री समाधान शिबिरातून विरोधकांवर टीका

संगमनेर | सुदिन न्यूज नेटवर्क
जोपर्यंत माझ्या पाठीशी सामान्य जनता आहे, तोपर्यंत मला कोणाची ही भीती नाही. जनतेने दिलेल्या विश्वासाच्या बळावरती या तालुक्यात विकासाची वाटचाल सुरू असून ती यापुढेही अधिक वेगाने सुरू राहील,” असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जन्मदिनाचे तसेच माजीउपमुख्यमंत्री स्व अजित पवार यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्वराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी आमदार खताळ बोलत होते यावेळी व्यासपीठावर संगमनेर उपविभागाचे प्रांत अधिकारी अरुण मुंडे तहसीलदार धीरज मांजरे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे महावितरण चे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी तालुका कृषी अधिकारी रेजा बोडकेसहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार भाजप ज्येष्ठ नेते भीमराज चत्तर शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी भाजप अल्प संख्यांक जिल्हाध्यक्ष राऊफभाई शेख भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष वैशाली राऊत नगर सेविका साक्षी सूर्यवंशी युवासेना उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख तालुकाप्रमुख सुशील शेवाळे शहर प्रमुख सार्थक शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महसूल कृषी पंचायत समिती वनविभाग या विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राचे लाभार्थींना वितरण करण्यात आले
आमदार खताळ म्हणाले की, संगमनेरमध्ये आता नागरिकांची कामे वेळेत होत आहेत. पूर्वीच्या काळी काही मोजक्या लोकांनी सरकारी कार्यालयांवर मक्तेदारी निर्माण केली होती. मात्र आता अधिकारी मोकळे पणाने काम करत असून सर्वसामान्य नागरिकांनाही सन्मानाची वागणूक मिळत आहे. शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याने प्रशासनावरील विश्वास वाढला असल्याचे त्यांनी सांगितले
, संगमनेर तालुक्यातील १४ महसूल मंडळांमध्ये विशेष अभियान राबवून १हजार७९७फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली, ३८० सातबारा उताऱ्यांमध्ये दुरुस्ती करण्यात आली, सुमारे ४ हजार ५०० डिजिटल सातबारे वितरित करण्यात आले, सुमारे १ हजार ७०० महसूल प्रमाणपत्रे देण्यात आली, तर एक खिडकी योजनेअंतर्गत १ हजार ७० अर्ज निकाली काढण्यात आले. याशिवाय तुकडाबंदी, मोजणी आणि इतर महसुली सेवांमध्येही मोठी प्रगती झाली आहे. विधानसभेत आपण सातत्याने तुकडाबंदी कायद्याचा प्रश्न उपस्थित केला होता. शासनाने त्यास सकारात्मक प्रतिसाद देत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यातील ५० लाख नागरिकांना लाभ झाला आहे. या निर्णयामुळे छोट्या भूधारकांना व सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना, नैसर्गिक आपत्तीतील मदत, पीएम किसान सन्मान निधी, कृषी यांत्रिकीकरण, सौर कृषी पंप, कृषी अवजारे तसेच विविध अनुदान योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे.तालुक्यात ५९ हजारांहून अधिक शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत असून, हजारो शेतकऱ्यांना सौर कृषी पंप, ट्रॅक्टर, कृषी अवजारे आणि इतर योजनांचा लाभ मिळाला आहे. तळेगाव परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी भोजापूर धरण, सिंचन योजना आणि कालव्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले

कौठे मलकापूर परिसरात एम आय डीसी उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यामुळे स्थानिक युवकांना मोठ्याप्रमाणावर रोजगारा च्या संधी उपलब्ध होतील, तसेच नाशिक–पुणे रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच व्हावा, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच आहै. मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून विधानसभा गाठण्याची संधी दिली. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवून विकासाची गती आणखी वाढविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन,” असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

जनतेच्या न्यायालयात माझा विजय झालेला आहे. सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणातही सामान्य मायबाप जनतेचाच आणि सत्याचाच विजय होईल, याची मला पूर्ण खात्री आहे. न्यायालयाने केवळ याचिका सुनावणीसाठी स्वीकारली आहे. मात्र काही जणांनी त्याचा चुकीचा अर्थ काढून पुन्हा मुख्यमंत्री होण्याची किंवा आमदार होण्याची स्वप्ने 

पाहायला सुरुवात केली आहे.”, “ज्यांचा पराभव संगमनेरच्या जनतेने केला, ते पुन्हा सत्तेची स्वप्ने पाहत आहेत. माझ्यासारख्या ४२ वर्षांच्या युवकाने त्यांचा पराभव केला. मी दोन वर्षाचा असताना ते आमदार झाले होते परंतु नियतीने आणि जनतेने त्यांचा पराभव केला हे त्यांना सहन होत नाही म्हणून ते माझ्यावर खोटे-नाटे आरोप करत आहे परंतु या तालुक्याचे सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर आहेत त्यामुळे मला कसली काळजी नाही
श्री अमोल खताळ
आमदार संगमनेर विधानसभा

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील १४ मंडळांमध्ये समाधान शिबिरे घेतले आहेत या शिबिराच्या माध्यमातून तालुक्यातील १० हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला
श्री अरुण उंडे
प्रांताधिकारी संगमनेर उपविभाग

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी राबवलं आणि या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाच्या अनेक योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून दिला
श्री धीरज मांजरे
तहसीलदार संगमनेर विभाग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!