Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
अकोलेटॉप न्यूज़धर्ममहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़संगमनेर

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये अश्विनाथ गडावर यात्रा हिंदू - मुस्लिम बांधव एकत्र पद्धतीने यात्रा साजरी करतात मानाच्या काठीचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निमोन येथे पूजन


संगमनेर : (सुदिन न्यूज नेटवर्क )
अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथगडावर परिसरातील लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि आनंदात यात्रा संपन्न झाली असून अश्विनीनाथ गड हा सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
निमोण येथे अश्विनाथ गडावर जाणाऱ्या मानाच्या काठीचे पूजन मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी आर्किटेक्ट बी.आर.चकोर, सोमनाथ धोंडीबा घुगे, ज्ञानेश्वर धोंडीबा घुगे, ॲड.ज्ञानेश्वर सांगळे, चंद्रकांत घुगे, साहेबराव दादा मंडलिक, अनिल घुगे, गोरख घुगे, डी.एम घुगे, भानुदास कांडेकर, सुरेश सांगळे,  पंढरी घुगे, शरद घुगे, बाळू घुगे, मधुकर नागरे, किसन घुगे, अण्णा कांडेकर,बाळासाहेब घुगे यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने भव्य मिरवणूक संपन्न झाली.
अश्विनाथ डोंगर हा पारेगाव बुद्रुक,चिंचोली गुरव,पिंपळे,निमोण, देवकवठे,सिन्नर तालुक्यातील नि-हाळे,घोटेवाडी, कहांडळवाडी या सर्व गावांच्या मध्यवर्ती असलेल्या आणि अत्यंत पारंपारिक यात्रा उत्सव साजरा होणारा आश्विनाथ गड हा भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. वर्षभर येथे नागरिकांची मोठी गर्दी राहत असून हिंदू – मुस्लिम बांधवांचे एकत्र असलेले हे मंदिर हे राज्यभराचे वैशिष्ट्य आहे. दर गुरुवारी मोठ्या प्रमाणात हिंदू व मुस्लिम बांधव येथे एकत्र येतात तर श्रावणातील तिसऱ्या गुरुवारी ही भव्य जत्रा भरते. उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या यात्रेसाठी येतात तर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून हिंदू बांधवही मोठ्या संख्येने एकत्र या ठिकाणी येत असतात. मुस्लिम आणि हिंदू एकत्र पद्धतीने यात्रा साजरा करण्याचा हा पारंपारिक योग अनेक वर्षांचा या ठिकाणी आहे. चिंचोली गुरव व पारेगाव बुद्रुकचे ग्रामस्थ देवाचा गाडा या ठिकाणी काढतात. बैलगाडीने गाडा ओढत सर्व यात्रेमध्ये मानाने मिरवला जातो रथ ज्यावेळेस येतो त्यावेळेसचा उत्साहाचे वातावरण हे या यात्रेचे मोठे वैशिष्ट्य असते.
यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारत हा विविध संस्कृती, जाती,पंथ,धर्म यांनी बनलेला आहे.विविधतेतून एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या या तीर्थक्षेत्राचे मोठे वैशिष्ट्य आहे. हिंदू व मुस्लिम बांधवासह सर्व धर्मीय बांधव या ठिकाणी एकत्र येतात पुजा करतात. धार्मिक भावनेने आनंदाने ही यात्रा साजरी करतात. एकमेकांप्रती आदर सहिष्णुता आणि एकात्मता असलेले हे सामाजिक एकतेचे मोठे प्रतीक आहे. निमोन येथे काठीचे होणारे स्वागत आणि प्रस्थान हे आनंददायी असते.
या मंदिर व परिसराच्या सुशोभीकरणासाठी सातत्याने निधी दिला असून या माध्यमातून हे आता मोठे धार्मिक व पर्यटन स्थळ झाले आहे हजारो भाविकांची उपस्थिती हे या यात्रेचे वैशिष्ट्य असल्याचेही ते म्हणाले.तर आर्किटेक बी.आर.चकोर म्हणाले की,लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अश्विनाथ गडाच्या विकासासाठी सातत्याने निधी दिला आहे.याचबरोबर सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनीही या परिसराच्या विकासासाठी सातत्याने निधी देऊन या परिसराचे सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे हे दोन्ही जिल्ह्यांचे मोठे धार्मिक आणि पर्यटनाचे क्षेत्र ठरले आहे. सर्वांची उपस्थिती हेच मोठे वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले.
निमोन येथे झालेल्या मानाच्या काठीच्या मिरवणुकीच्या वेळी गावांमधून युवकांनी पारंपारिक वाद्यात गुलालाची उधळण करत भव्य मिरवणूक काढली. यावेळी तरुणांची उपस्थिती व जल्लोष मोठा होता.
अहिल्यानगर,नाशिक जिल्ह्यातून हिंदू व मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती होती. तरुणांची महिलांची उपस्थिती आणि धार्मिक वातावरणात,घोषणा व पारंपारिक सांस्कृतिक पद्धतीने ही यात्रा मोठ्या आनंदाने संपन्न होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!