Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
टॉप न्यूज़राज्यलोकल न्यूज़संगमनेर

वनहद्दीत मेंढ्या चारण्यासाठी मेंढपाळांची अडवणूक करू नका

आमदार अमोल खताळ यांच्या वनविभागाला सक्त सूचना

संगमनेर/प्रतिनिधी
वनविभागाच्या हद्दीत पारंपरिक पद्धतीने मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मेंढपाळांना शासनाच्या नियमांनुसार मेंढ्या चारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वनहद्दीत मेंढ्या चारण्यासाठी मेंढपाळांची अडवणूक करू नका अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचा पारंपरिक व्यवसाय मेंढीपालनावर अवलंबून आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर मेंढ्यांना चराईसाठी विविध भागांत घेऊन जाण्याची परंपरा आहे. मात्र, वनहद्दीत मेंढ्या घेऊन जाताना वनविभागाच्या नियमांमुळे राज्यातील मेंढपाळांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील मेंढपाळांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन वनविभागाच्या हद्दीत मेंढ्या चारण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. मेंढपाळांच्या या मागणीची दखल घेत आमदार खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला.

दरम्यान, वनहद्दीत मेंढ्या चारण्यासंदर्भात शासनाने अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशाचे मेंढपाळ समाजाकडून स्वागत करण्यात येत आहे. शासनाच्या नियमांनुसार मेंढपाळांना चराईसाठी आवश्यक ती परवानगी देण्यात यावी. मेंढपाळांनीही स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून नियमांचे पालन करावे. तसेच मेंढपाळ समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला संरक्षण देऊन त्यांच्या अडचणी दूर कराव्यात, अशा सूचना आमदार खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार खताळ यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मेंढपाळांच्या चराईचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली असून, त्यांच्या प्रयत्नांचे तालुक्यातील मेंढपाळ समाजबांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!