Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
टॉप न्यूज़देशधर्ममहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़संगमनेर

काहींनी ४० वर्ष फक्त बोलून दाखवले; पण आमदार अमोल खताळ यांनी एका वर्षात करून दाखवले

डोळासने निवासी वीजजोडणीसाठी तब्बल १० लाखाचा निधी मंजूर;

संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील डोळासणे परिसरातील नागरिकांच्या निवासी वीज जोडणीचा प्रश्न मार्गी लावण्या साठी आमदार अमोल खताळ पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठ पुराव्यास मोठे यश मिळाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत OTSP योजनेतून निवासी वीज जोडणीच्या कामांसाठी तब्बल १० लाख १हजार ७९७ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मंजूर निधीतून संबंधित कामांना प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे. त्यामुळे ज्यांना चाळीस वर्षात करता आले नाही ते आमदार अमोल खताळ यांनी एका वर्षात करून दाखवले
संगमनेर तालुक्याच्या पठार भागा तील डोळासणे परिसरातील अनेक कुटुंबांना निवासी वीज जोडणीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांच्या या प्रश्नाकडे आमदार अमोल खताळ पाटील यांनी गांभीर्याने लक्ष देत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध झाला असून, आता प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट
“मागील चाळीस वर्षांत केवळ आश्वासने आणि चर्चा झाल्या; मात्र नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रत्यक्ष काम झाले नाही. आमदार अमोल खताळ पा यांनी पदभार स्वीकारल्या नंतर अवघ्या एका वर्षात या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला आणि काम प्रत्यक्ष सुरू केले. निवासी वीज जोडणीसारखा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला प्रश्न मार्गी लागत असल्याने डोळासणे परिसरातील नागरिकांनी आमदार अमोल खताळ पाटील यांचे आभार मानले आहे
श्री राहुल मुके
महायुती डोळसणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!