Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
टॉप न्यूज़महाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़संगमनेर

संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी शरद गांडोळे

उपाध्यक्षपदी सुमेध संत; सचिवपदी कपिल टाक, कार्यकारिणीची एकमताने निवड

संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी येथील व्यापारी शरद गांडोळे यांची, तर उपाध्यक्षपदी सुमेध संत सचिवपदी कपिल टाक, सहसचिवपदी शेखर गाडे आणि खजिनदारपदी विशाल पडतानी यांची एकमताने निवड करण्यात आली.
यांची निवड करण्यात आली,

संगमनेर व्यापारीअसोसिएशनची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे मावळते अध्यक्ष योगेश कासट होते. यावेळी संस्थेचे सचिव शरद गांडोळे, जुगलकिशोर बाहेती, सुमेध संत यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. व्यापारी बांधवांच्या विविध अडचणी व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रभावी पणे काम केले जाईल तसेच व्यापारी वर्गासमोरील प्रश्नांबाबत शासकीय स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे नूतन अध्यक्ष शरद गांडोळे यांनी सांगितले.नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल व्यापारी वर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!