टॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़संगमनेर

कौठे मलकापूरलाच एम आय डी सी होणार – आमदार खताळ

संगमनेर/ प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने मला काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे दिवस-रात्र जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील असून, सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावत विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, एम आय डी सी घारगावला होणार, बोटा येथे होणार अशा वावड्या उठवून स्टंटबाजी करण्याचे काम काही जणांकडून सुरू आहे, असा टोला आमदार अमोल खताळ यांनी आमदार सत्यजित तांबे यांना लगावला. तसेच, कुणी कितीही प्रयत्न केले, तरी संगमनेरची एमआयडीसी कौठे मलकापूर येथेच होणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलासंगमनेर तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व औद्योगिक विकासाला चालना मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कवठे मलकापूर येथे प्रस्तावित कौठे मलकापूर येथील एम आय डी सी च्या जागेची आमदार खताळ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर बर्गे अहिल्यानगरचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड पुणे येथील कार्यकारी अभियंता संजय कोतवाड, अहिल्यानगरचे उप रचनाकार सुहास लाहोटी, सहाय्यक अभियंता राहुल बळी, प्रमुख भूमापक फुलचंद कातकडे, एकनाथ ठाकरे यांच्यासह म

हायुतीचे बाळासाहेब खेरनार हरिभाऊ गीते गुलाब भोसले राउफ शेख रवींद्र दातीर ऍड अमित धुळगंड अनिल आमले गणेश डोंगरे गोरख बागुल नवनाथ गंभीरे यांच्यासह साकुर पठार भागातील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होआ. खताळ म्हणाले, की संगमनेर मध्ये एम आय डी सी उभारण्याची आग्रही मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वारंवार केली होती. संगमनेर येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एम आय डी सी संगमनेरमध्येच होणार, असा शब्द दिला होता. त्यासाठी लागणारी जमीन देण्याची तयारी शेतकऱ्यांनी दाखवली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्याची एमआयडीसी ही कौठे मलकापूर येथेच होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले

संगमनेरच्या जनतेने तुम्हाला नाकारून घरी बसवले आहे. त्यामुळे तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांमध्ये विनाकारण अडथळे आणू नका. विकासकामांना विरोध केला तर हीच

सर्वसामान्य जनता आगामी काळात तुम्हाला नक्कीच उत्तर देईल. असा इशारा देत ते म्हणाले की गेल्या चाळीस वर्षांत जे साध्य झाले नाही, ते एका सर्वसामान्य तरुणाला अवघ्या दीड वर्षात करून दाखविण्याची संधी मिळाली आहे. याचे शल्य काहींच्या मनात असल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. मात्र, विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरी कौठे मलकापूर येथील एम आय डी सी चा निर्णय मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगून कौठे मलकापूर येथील प्रस्तावित एमआयडीसी गुंतवणूक करण्यासाठी अनेक नामांकित कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे परिसरातील तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही आमदार खताळ यांनी व्यक्त केला.

कौठे मलकापूर येथे प्रस्तावित एम आय डी सी साठी आवश्यक असलेले पाणी राखीव ठेवण्याचा शब्द राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे पाण्याबाबत काळजी करण्याचे कारण नाही. कौठे मलकापूर येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना लवकरच आणणार आहे…..!अमोल खताळ, आमदार

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!