Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
अकोलेटॉप न्यूज़देशधर्ममहाराष्ट्रयुवाराजनीतिलोकल न्यूज़संगमनेर

बहिणींच्या प्रेमाचा धागा; आमदार अमोल खताळ यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन उत्साहात

लाडक्या बहिणींनी औक्षण करून बांधली राखी

संगमनेर/ प्रतिनिधी
भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी लाडक्या बहिणींनी आमदार खताळ यांचे औक्षण करून त्यांच्या हातात राखी बांधत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

रक्षाबंधनानिमित्त आमदार खताळ यांच्या निवासस्थानी बहिणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बहिणींनी औक्षण करून प्रेमाने राखी बांधली. या वेळी भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. राखी बांधल्यानंतर उपस्थित बहिणींनी आमदार खताळ यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला सदैव पाठिंबा आणि आशीर्वाद राहील, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी आमदार खताळ यांनी उपस्थित सर्व बहिणींच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आशीर्वादाचा स्वीकार करत त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. बहिणींचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. आपल्या बहिणींच्या सुख-दुःखात सदैव त्यांच्या पाठीशी भाऊ म्हणून उभे राहण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून भाऊ-बहिणीमधील प्रेम, जिव्हाळा आणि परस्पर विश्वास अधिक दृढ करणारा सण आहे. याच भावनेतून आमदार खताळ यांच्या निवासस्थानी आलेल्या बहिणींनी राखी बांधून आपले प्रेम व्यक्त केले. यावेळी सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. लाडक्या बहिणींनी प्रेमाने बांधलेली राखी आणि दिलेला आशीर्वाद यामुळे यंदाचे रक्षाबंधन आमदार अमोल खताळ यांच्यासाठी विशेष ठरले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ-बहिणीच्या नात्यातील स्नेहाचा धागा आणखी घट्ट झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!