शिवस्मारक भव्य जागेत उभारण्यास पालिकेतील सेवा समितीचाच खोडा-अभिजीत पुंड
दिलीप पुंड नगराध्यक्ष होते, तेव्हा महाराजांची आठवण का नाही झाली?

संगमनेर : प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वाढीव जागेतच करण्याबाबत महायुती सरकार योग्य निर्णय करे
ल.छोट्या जागेत स्मारक करून जनतेच्या मनात असलेल्या भव्य स्मारकाच्या कामात खोडा घालण्याचे पाप पालिकेतील सेवा
समितीने करू नये असा इशारा शिवसेनेचे कार्यकर्ते अभिजीत पुंड यांनी दिला आहे.
स्वता: अनेक वर्ष नगराध्यक्ष असताना कधी महाराजांच्या स्मारकाचा विषय काढण्याची आठवण न झालेल्या नगरसेवक दिलीप पुंड यांनी महायुती सरकारवर टिका करून आपले हसू करून घेवू नये आशी खरमरीत टिकाही अभिजीत पुंड यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत दिलीप पुंड यांनी काढलेल्या पत्रकावर टिका करताना अभिजीत पुंड म्हणाले की,शहरात भव्य स्मारक उभारण्याची संकल्पना ही मुळातच महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे.आ.अमोल खताळ यांनी निवडून येण्यापुर्वीच स्मारका
साठी महायुती सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता.
स्मारकाची चर्चा सुरू झाल्यानंतर केवळ श्रेय लाटण्यासाठी पालिकेत घाई घाईने ठराव केल्याचा सोयीस्कर विसर दिलीप पुंड यांना कसा पडला ॽशहरात बस स्थानकाचे काम सुरू
असताना महाराजांच्या स्मारकाला जागा ठेवण्याची आठवणही तुम्हाला राहीली नाही.तेव्हा तर राज्यात आणि पालिकेत सताही तुमच्या पक्षाची होती.आता केवळ 4 X 6 जागेत स्मारक उभारण्याची तुमची धडपड अतिशय केविलवाणी असल्याचा टोला अभिजीत पुंड यांनी लगावला.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक भव्य दिव्य आणि त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे व्हावे या उद्देशाने आ.अमोल गताळ वाढीव जागेसाठी पाठपुरावा करीत असून लवकरच त्यांच्या प्रयत्नांना यश येईल हा विश्वास महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे.
परंतू चाळीस वर्षे ज्यांना महारांजाचे स्मारक उभारण्याची आठवण सुध्दा झाली नाही त्यांना वास्तविक दिलीप पुंड यांनी प्रश्न विचारायला हवा होता, परंतू त्यांची हिमंत होणार नाही.विशेष म्हणजे स्वता अनेक वर्ष पालिकेत नगरसेवक नगराध्यक्ष पद भुषवले तेव्हा सुध्दा दिलीप पुंड यांनी महाराजांचे स्मारक उभारण्याची इच्छा वाटली नाही.
आता केवळ नगराध्यक्षांची मर्जी राखण्याची वेळ आपल्यावर आल्यामुळे त्यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टवरून थेट महायुती सरकारवर करीत असलेली टिका म्हणजे स्वता: चे हसू करून घेण्यासारखे असल्याचे अभिजीत पुंड म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय राजकारणाचा नाही. परंतू तुम्हीच पत्रकबाजी करून या विषयाचे राजकाराण करीत आहात.स्मारकासाठीच्या वाढीव जागेचा प्रस्ताव मंजूर होईपर्यत छोट्या जागेत स्मारकाचे काम करू नये ही संगमनेरच्या जनतेची आणि शिवप्रेमीची मागणी आहे. जनतेच्या मनात असलेल्या महाराजांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीत केवळ छोट्या जागेचे भांडवल करून आपणच खोडा घालण्याचे पाप करू नये असा इशारा अभिजीत पुंड यांनी दिला आहे.




