Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
अकोलेटॉप न्यूज़महाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़संगमनेर

अकोले शहरातील कोल्हार घोटी रोड सीडी वर्क संरक्षक कठडे तात्काळ करा— ग्राहक पंचायत

अन्यथा आंदोलन व रस्ता रोको करण्यात येईल....

अकोले (सुदिन न्यूज नेटवर्क) अकोले शहरातील कोल्हार-घोटी
रोड सेंन्ट्रल बँक व शॅम्प्रो ऑफिस समोर रोड लगत सतत होत असलेले अप‌घात होत असून येथे सीडी वर्क व संरक्षक कठडे तात्काळ होण्याबाबत व दिशादर्शक फलक ‘झेब्रा-क्राॅसिंग आणि इतर सूचनांचे निवेदन तहसिलदार डॉ.सिध्दार्श मोरे, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम अकोले यांना दिल्याची माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, माधवराव तिटमे, दत्ता ताजणे यांनी दिली.
निवेद‌नात म्हटले आहे की अकोले शहरातील कोल्हार घोरी रोड, सेंन्ट्रल बॅंक व शॅम्प्रो ऑफीस समोर रोड लगत आज पर्यंत बरेच अपघात झाले आहे.
अकोले नगरपंचायत हद्दी मध्ये नेहमी मोटार सायकल, जिप, ट्रक, मोठी आवजड वाहने, महिला, ज्येष्ठ, नागरिक, दिव्यांग व्यक्ती, शालेय विद्यार्थी येजा चालू असते. वरिल अपघाताच्या ठिकाणी बाबत ग्राहक पंचायत अकोले व अनेक संघटनांनी व व्यक्तीगत नागरीकांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडे लेखी, तोंडी सुचना व तक्रारी केल्या आहेत, याची सार्वजनिक कार्यालय व अधिकारी यांनी दखल घेत‌लेली वाटत नाही.
तसेच आपले कार्यालय व अधिकारी असे किती अप‌घात झाल्या नंतर किंवा अपघातात एखाद्याचा जीव गेल्या नंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार आहे काय ? असा संतप्त सवाल अकोले शहरातील नागरीकांकडून विचारण्यात येत आहे.
या पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने रस्ते अपघाताबाबत आदेश व सुचना केल्या आहेत याचे आपल्या सार्वजनिक कार्यालयाने व अधिकाऱ्यांनी पालन करावे व नागरीकांच्या मुलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आपल्या स्तरावर त्वरित कार्यवाही होईल अशी अपेक्षा आहे असे निवेदनात म्हटले आहे
 अन्यथा आंदोलन व रस्ता रोको करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची असेल.
निवेदनावर ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, अध्यक्ष दत्ता शेनकर, सचिव राम रुद्रे, कार्याध्यक्ष महेश नवले,प्रा.डॉ. सुनील शिंदे, माधवराव तिटमे, बबनराव तिकांडे, दत्तात्रय ताजणे, सुनील देशमुख, साहेबराव दातखिळे, ज्ञानेश्वर पुंडे, बादशहा ताजणे, रामदास पांडे, भाऊसाहेब वाकचौरे आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!