टॉप न्यूज़देशधर्ममहाराष्ट्रयुवालोकल न्यूज़शिक्षणशेतीसंगमनेर

मालपाणी उद्योगसमूह गणेशविसर्जन मिरवणुकीने संगमनेरकर भारावले

आमदार अमोल खताळ मनीष मालपाणी गिरीश मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती

संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूह गणेश विसर्जन मिरवणुकीत . पारंपरिक वाद्यांचा गजर, विविध कलाविष्कार आणि गणरायाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. या मिरवणुकीत आमदार अमोल खताळ यांनी सहभागी होत कलाकारांचा उत्साह वाढविला.
मालपाणी उद्योग समूहाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रचार रिक्षा
ढोल ताशा पथक,लेझीम डान्स,बांबू डान्स पायटे डान्स,बगाड यात्रा,साई पालखी,अँक्रोबीटस-मँजीका,गोरिला + तात्या विंचू,देवीचा गोंधळ,नरसिंहा
छत्रपती शिवाजी डान्स,अप्पू राजा डान्स,राधा कृष्ण डान्स,झुंबा डान्स
हनुमान थीम डान्स महाकाल नृत्य+ अघोरी छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा वस्त्रहरण अमृताचहा -फिरती
गणेश रथ गणेश मूती ट्रोली पाणी टॅन्कर,स्वच्छता ट्रोली,कलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्कारांचे आमदार अमोल खताळ यांनी कौतुक केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचे जतन होत असून, अशा उपक्रमांमुळे कलाकारांना प्रोत्साहन मिळते, असे आमदार खताळ यांनी सांगितले

या मिरवणुकीत आमदार अमोल खताळ पाटील मालपाणी उद्योग समूहाच्या अर्धायु
ललिता देवी मालपाणी संचालक मनीष मालपाणी गिरीश मालपाणी नगरसेविका रचना मालपाणी सुनीता मालपाणी यांच्यासह मालपाणी उद्योग समूहाचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने संचालक मनीष मालपाणी गिरीश मालपाणी यांनी आमदार अमोल खताळ यांचा सन्मान केला. यावेळी मालपाणी उद्योग समूहाच्या सौ. ललितादेवी मालपाणी यांच्या जन्मदिवसानिमित्त आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
गणरायाला निरोप देताना मिरवणुकी मध्ये सहभागी नागरिक, कर्मचारी, कलाकार व मान्यवरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. धार्मिक वातावरणात आणि आनंदोत्सवात ही विसर्जन मिरवणूक पार पडली.
चौकट
परंपरा पुन्हा सुरू होणे ही आनंदाची बाब – आ. अमोल खताळ
मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने दरवर्षी होणारी गणेश विसर्जन मिरवणूक दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाली, ही आनंदाची बाब आहे. मालपाणी परिवार सामाजिक जाणीवेतून सातत्याने कार्य करत आहे, त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे. संगमनेर तालुक्यात परिवर्तनानंतर बंद पडलेल्या अनेक हिंदू धार्मिक परंपरा पुन्हा सुरू झाल्या असून त्या अविरतपणे सुरू राहाव्यात. धर्म कार्याला सर्वांनी सहकार्य करावे. गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की, सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!