टॉप न्यूज़राजनीतिराज्यलोकल न्यूज़संगमनेर

दिव्यांग बांधवांना संजय गांधी समितीवर प्रतिनिधित्व देणार : आमदार खताळ

शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सूचना; शिवसेनेत हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश

संगमनेर/ प्रतिनिधी
दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समिती वर प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला जाईल. या समितीवर दिव्यांग बांधवांचा प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या वतीने सुचविण्यात येणाऱ्या एका व्यक्तीला समितीवर शासकीय सदस्य म्हणून संधी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. दिव्यांग बांधवांना शासकीय कार्यालयांमध्ये योजनांचा लाभ मिळविताना कोणत्याही कोणत्याही प्रकारची अडवणूक किंवा अन्याय सहन करावा लागणार नाही, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.

संगमनेर शहरातील मातोश्री लॉन्स येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यासह पठार भागातील हजारो कार्यकर्ते, महिला, तरुण व दिव्यांग बंडू भगिनींनी आ. अमोल खताळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आदिशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलम खताळ शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी युवासेना उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे उप तालुका प्रमुख रणजीत जाधव नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, सुनिता कुरकुटे गोविंद भरीतकर , सुरेश ढोकरे, निलेश सातपुते, नंदाताई खेमनर, अजय धुळगंड, गोकुळ मेहेत्रे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
आमदार खताळ म्हणाले, दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष देण्याचे आश्वासन देतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविणे हेच आपले ध्येय आहे. तालुक्यातील संजय गांधी समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपल्या कार्यकाळात दिव्यांग बांधवांची अनेक प्रकरणे मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केले. रेशनकार्डसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठीही स्वतः पुढाकार घेतला. शासकीय योजनांचा लाभ मिळविताना दिव्यांग बांधवांना वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. यापुढेही त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल.

दिव्यांग बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणजे केवळ पक्षाची ताकद वाढली, एवढाच त्याचा अर्थ नाही. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने लक्ष देण्याची जबाबदारीही वाढली आहे. दिव्यांग बांधवांच्या वतीने प्रतिनिधी निवडून त्यांना आवश्यक अधिकार आणि जबाबदारी देण्यासाठीही प्रयत्न केले जातील. संगमनेर विधानसभा मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्याचा विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे. पठार भागातील अनेक नागरिकांचे संगमनेर शहर आणि तालुक्यात नातेवाईक व मित्रपरिवार आहेत. निवडणुकीच्या काळात सामान्य कुटुंबांतील नागरिकांनी आपल्याला सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणि अपेक्षांची आपल्याला जाणीव आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कायम तत्पर आहे.

आदिवासी कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक दाखले मिळवून देण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. शासकीय कार्यालयात कोणत्याही योजनेचा लाभ घेताना अडचण आल्यास शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संबंधित नागरिकांच्या मदतीला धावून जावे, असे आवाहन त्यांनी केले. दिव्यांग बांधवांना कोणी त्रास देत असेल किंवा योजनांचा लाभ मिळविताना अडवणूक करीत असेल, तर संबंधितांविरोधात आवाज उठविण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घ्यावी. सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष संघटनेने नेहमी तत्पर राहावे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीमध्ये महिलांचे योगदान वाढावे, यासाठी विविध योजनांची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत काही महिलांकडून चुका झाल्यामुळे त्यांचा लाभ बंद झाल्याच्या तक्रारी आहेत. अशा महिलांना पुन्हा ई-केवायसी करण्याची संधी मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. ही संधी उपलब्ध झाल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महिलांच्या घरी जाऊन त्यांच्या अर्जांची आणि ई-केवायसीची स्थिती तपासावी. तसेच त्यांचा लाभ पुन्हा सुरू होण्यासाठी मदत करावी, असे निर्देशही आमदार खताळ यांनी दिले.
कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख तालुकाप्रमुख सुशील शेवाळे सुनीता कुरकुटे, कुरकुटे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मान-सन्मान दिला जातो. पक्षात लहान-मोठा असा भेद नसून प्रत्येक शिवसैनिक महत्त्वाचा आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढते. त्यांनी घराघरांत पोहोचून नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.– रमेश काळे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

दिव्यांग बांधवांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवून शिवसेना परिवारात प्रवेश केला, ही आनंदाची बाब आहे. कुटुंबप्रमुखाने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला जपणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे संघटनेत आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मान देऊन तिच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. दिव्यांगत्वामुळे कोणाच्याही आत्मविश्वासाला धक्का बसू देऊ नये. शारीरिक मर्यादा असल्या, तरी मनाने खंबीर राहून प्रत्येकाने स्वतःची क्षमता सिद्ध करावी. नीलम खताळ, अध्यक्षा, आदिशक्ती फाउंडेशन.

संपादक – सुदिन राजेमाने

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!