धर्ममहाराष्ट्रयुवालोककलालोकल न्यूज़शेतीसंगमनेर
डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत सावरगाव मध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रम
तरुण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दांडीया चा कार्यक्रम होणार आहे.

संगमनेर ( प्रतिनिधी ) दूध व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या सावरगाव तळ मध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी सात वाजता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सावरगाव तळ गावाने दूध व्यवसाय व शेती व्यवसायातून आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे. या सर्व समृद्धीमध्ये महिला भगिनींचाही मोठा वाटा राहिला आहे. दिवसभर काम करून महिलांना जीवनामध्ये इतर आनंद मिळावा याकरता तरुण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दांडी यांचा कार्यक्रम होणार आहे.
यानिमित्ताने मंगळवारी 7 वा. डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये संगमनेरी लय भारी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांमध्ये गावातील सर्व महिला व युवती सहभागी होणार आहेत या कार्यक्रमासाठी मंदिर परिसरामध्ये सुशोभीकरणासह विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.
तरी खेळ पैठणीचा या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व महिला,युवक,युवती व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तरुण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


संपादक – सुदिन राजेमाने




