अमोल खताळटॉप न्यूज़महाराष्ट्रराजनीतिलोकल न्यूज़संगमनेर

‘तुमच्या घरांचे उतारे तुमच्या नावावर करून देण्याची जबाबदारी माझी!’ – आ. अमोल खताळ

वडारवस्ती व संजय गांधी नगरमधील नागरिकांना आमदार खताळ यांनी दिला शब्द वडार वस्ती आणि संजय गांधी नगर शिवसेना शाखेचा आमदार खताळ यांच्या हस्ते शुभारंभ

संगमनेर, प्रतिनिधी
गेली चाळीस वर्षे आमदारकी, मंत्रीपद आणि विविध सत्तास्थाने असतानाही संगमनेर शहरातील संजय गांधी नगर आणि वडार वस्ती परिसरातील नागरिकांच्या घरांच्या मालकी हक्काचा व उताऱ्यांचा प्रश्न सुटू शकला नाही. निवडणुका आल्या की नागरिकांचा मतांसाठी वापर केला गेला; मात्र त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले, अशी टीका करत या परिसरातील नागरिकांच्या घरांचे उतारे त्यांच्या नावावर करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.

शहरातील वडार वस्ती आणि संजय गांधी नगर येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, माजी नगरसेवक आप्पा पवार युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, शहरप्रमुख सार्थक शेवाळे, समीर ओझा मार्गदर्शक प्रकाश पवार शाखाध्यक्ष अण्णा शिंदे उपाध्यक्ष संजय शिंदे सोमनाथ रणसुरे कार्याध्यक्ष संपत पवार सचिव आकाश पवार , खजिनदार सुनील पवार संघटक दिलीप पवार मारुती चव्हाण शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख दीपाली वाव्हळ, रेखा गलांडे यांच्यासह वडार वस्ती परिसरातील महिला पुरुष तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते

आमदार खताळ म्हणाले की, संजय गांधी नगर आणि वडार वस्ती परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून घरांच्या मालकी हक्कासह विविध समस्यांचा सामना करीत आहेत. घरांचे उतारे आणि मालकी हक्काचा प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे आणि त्यांच्या घरांच्या नोंदी त्यांच्या नावावर व्हाव्यात, यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी या पूर्वी ही तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता. मुंबईत यासंदर्भात बैठकही घेण्यात आली होती तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी स्वतः या भागाची पाहणी केली होती. नागरिकांना न्याय मिळावा व त्यांच्या घरांच्या मालकी हक्काबाबत योग्य निर्णय व्हावा, या साठी आपण प्रयत्नशील आहे.

संगमनेर मध्ये राजकीय परिवर्तन झाल्यानंतर सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले आहे. नागरिकांच्या मनातील भीती दूर करून त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी आपण काम करीत आहोत. आपणही सामान्य कुटुंबातून पुढे आलो असल्याने सर्वसामान्यांच्या अडचणींची जाणीव आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असेही आमदार अमोल खताळ यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाला संजय गांधी नगर आणि वडार वस्ती परिसरातील नागरिक, महिला, युवक-युवती आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर तसेच शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेच्या शाखा उभारण्यात येणार आहेत. ‘गाव तेथे शिवसेना शाखा आणि घर तेथे शिवसैनिक’ हे अभियान राबवून या शाखांच्या माध्यमातून नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. महिलांचे संरक्षण, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व बचत गटांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचे अर्थकारण मजबूत करणे, यालाही प्राधान्य दिले जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!