वाघापूर मागासवर्गीय निधीतील अनियमिततेप्रकरणी सात दिवसात कारवाईचे गटविकासअधिकारी यांचे लेखी आश्वासन
नीलम खताळ यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन विनोद घोलप यांनी सोडले उपोषण

संगमनेर:सुदिन न्यूज नेटवर्क
संगमनेर तालुक्यातील वाघापूर ग्रामपंचायतीमध्ये सन २०२४-२५ आणि सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांतील ग्रामनिधीच्या १५ टक्के मागासवर्गीय निधीच्या खर्चात अनियमितता तसेच भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप करत वाघापूरचे माजी उपसरपंच विनोद घोलप यांनी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शुक्रवारी उपोषण सुरू केले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी संबंधित सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून सात दिवसांत खुलासा मागवत, नियमा नुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले त्यानंतर विनोद घोलप यांनी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ आणि गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषण सोडले
संगमनेर तालुक्यातील वाघापूर येथील ग्रामपंचायतीच्या १५ टक्के मागासवर्गीय निधीच्या खर्चामध्ये अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना पदमुक्त करावे, अन्यथा पंचायत समितीसमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा वाघापूरचे माजी उपसरपंच विनोद घोलप यांनी दिला होता. परंतु घोलप यांच्या अर्जावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही त्यामुळे त्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्यांच्या या उपोषणाची आ.अमोल खताळ यांनी गंभीर दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सिनारे यांनी या प्रकरणी तातडीने तोडगा काढावा, अशा सूचना दिल्या.
गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी उपोषणकर्ते घोलप यांची भेट घेत चर्चा केली २६ मे२०२४ रोजी विस्तार अधिकारी यांनी वाघापूर ग्रामपंचायतीला भेट देऊन सन २० २४-२५ आणि सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांतील १५ टक्के मागास व
र्गीय निधीच्या खर्चा संदर्भातील अभिलेखांची तपासणी केली असून त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे. असे लेखी गटविकास अधिकारी सिनारे यांनी उपोषणकर्ते विनोद घोलप यांना लेखी पत्राद्वारे दिले.त्यानंतर आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ व गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्या हस्ते नारळपाणी घेऊन विनोद घोलप यांनी आपले उपोषण मागे घेतले.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, आरपीआयचे तालुका ध्यक्ष आशिष शेळके यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




