संगमनेर आगाराला १० इलेक्ट्रिक शिवाई बस
आमदार खताळ यांच्या हस्ते सहा बसचे लोकार्पण

संगमनेर/ प्रतिनिधी
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आणि आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून संगमनेर आगारासाठी तब्बल २५ इलेक्ट्रिक शिवाई बस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १० इलेक्ट्रिक बस संगमनेर आगारात दाखल झाल्या असून, यातील सहा बसचे विधिवत पूजन करून आमदार अमोल खताळ आणि पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते विधिवत पूजन होऊन लोकार्पण करण्यात आले.
या इलेक्ट्रिक बससेवेमुळे संगमनेर च्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक आणि पर्यावरणपूरक स्वरूप प्राप्त होणार असून, प्रवाशांना वातानुकूलित बसमधून आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे, असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. यावेळी प्रवासी वर्गासह चालक वाहक आणि इतर कर्मचारी यांना स्वच्छ शुद्ध पिण्याचे पाणी स्वच्छ स्वच्छतागृह आणि इतर सुविधा बस स्थानक प्रमुख म्हणून आपण उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे यांना केल्या
लोकार्पण झालेल्या सहा इलेक्ट्रिक शिवाई बसपैकी पुणे मार्गावर काही बसच्या फेऱ्या अर्ध्या तासाच्या अंतराने सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे मार्गावरील या फेऱ्या नियमितपणे सुरू राहणार असून, उर्वरित बस जिल्ह्यातील विविध मार्गांवर चालविण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे यांनी दिली.
दरम्यान, संगमनेर आगारांमध्ये दाखल झालेल्या इलेक्ट्रिक शिवाई बससेवेचे लोकार्पण झाल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी स्वतः नव्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमधून नाशिक रोडच्या दिशेने फेरफटका मारला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही बसमध्ये सहभागी झाले होते. नव्या इलेक्ट्रिक बसमधील आसन व्यवस्था, वातानुकूलित सुविधा तसेच प्रवासातील सोयी-सुविधांची आमदार खताळ यांनी पाहणी केली.
या लोकार्पण सोहळ्याला संगमनेर आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे ज्येष्ठ नेते उत्तम कर्पे वसंत देशमुख आबासाहेब ज्ञानेश्वर कर्पे थोरात विठ्ठल घोरपडे रमेश काळे बादशाह गुंजाळ सोमनाथ कानवडे हरीश चकोर गुलाब भोसले राउफ शेख रवी दातीर भगवान गीते रोहित चौधरी सौरभ देशमुख सुशील शेवाळे प्रसाद पवार नवनाथ जोंधळे आशिष शेळके कैलास कासार विनायक वाडेकर साक्षी सूर्यवंशी दिपाली वाव्हळ सपना जाधव यांच्यासह शिवसेना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संगमनेर आगाराला मिळालेल्या या इलेक्ट्रिक बसेसमुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिने अभिनेता नाना पाटेकर यांना महायुतीच्या वतीने श्रद्धांजली
सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असल्याचे सांगत आमदार अमोल खताळ तसेच शिवसेना व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बस लोकार्पण सोहळ्यादरम्यान दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयातून मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह समाजाच्या विविध क्षेत्रांत शोक व्यक्त होत असताना, संगमनेरातील या कार्यक्रमातही त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.






