दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांचे रक्षण होवो! आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना
सुदिन राजेमाने व तांभोळच्या सरपंच सौ. जयश्रीताई सुदिन राजेमाने यांच्याकडून दसरा-विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

अकोले/संगमनेर | सुदिन न्यूज नेटवर्क

सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवून देणाऱ्या दसरा व विजयादशमीच्या मंगलपर्वानिमित्त सुदिन न्यूजचे संपादक सुदिन राजेमाने आणि तांभोळच्या विद्यमान सरपंच सौ. जयश्रीताई सुदिन राजेमाने यांनी सर्व तांभोळ ग्रामस्थ मित्रपरिवार वाचक यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत संकटांचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांचे आई माता तुळजाभवानीने रक्षण करावे, त्यांच्या कष्टांना यश मिळावे, शेतशिवार हिरवेगार व्हावे आणि शेतकरी कुटुंबांच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत, अशी भावपूर्ण प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
तांभोळसह परिसरातील सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य, सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो. प्रत्येकाच्या जीवनात आनंद नांदो, समाजात एकोपा वाढो आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.




