संगमनेर नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

संगमनेर : सुदिन न्यूज नेटवर्क
संगमनेर शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता संगमनेर नगरपरिषद प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरपरिषदेमार्फत शहरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच आगामी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा, पायाभूत सुविधा आणि नागरी विकासाच्या दृष्टीने ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
या कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब थोरात व मा. सुपर्णाताई मालपाणी यांचे शुभहस्ते लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. सुधीर तांबे भूषविणार आहेत.
कार्यक्रमास आमदार सत्यजित तांबे, विधानपरिषद सदस्य; मा. सौ. दुर्गाताई तांबे, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष; तसेच मा. डॉ. जयश्री थोरात, अध्यक्ष, एकवीरा फाउंडेशन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी मा. दिलीपराव पुंड, मा. विरभराव मुर्तडक, मा. कैलासराव लोंणारी आणि मा. अरुणराव वाकचौरे यांच्यासह नगरपरिषदेतील विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तसेच उपनगराध्यक्ष नुरमोहमद शेख, विद्यमान नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांचीही उपस्थिती राहणार आहे. विविध समित्यांचे सभापती व उपसभापती, नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांचीही कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे.
संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित या विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यास सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.




