Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
Uncategorizedटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़संगमनेर

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

राजे उमाजी नाईक यांची 235 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

संगमनेर ( प्रतिनिधी ) आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध पहिला लढा उभारला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात रामोशी समाजाने अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठतेने काम केले. प्रामाणिक एकनिष्ठ आणि लढवय्या असा हा रामोशी समाज आहे. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे गौरव उद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

सायखिंडी फाटा व यशोधन कार्यालय मैदानावर राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित 235 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, देवराम गुळवे, तानाजी शिरतार, खर्डे गुरुजी, रमेश गफले,सचिन गुळवे, सचिन बोऱ्हाडे,संजय चव्हाण, रोशन गोपने,श्रीराम पवार,प्रा.बाबा खरात, दिलीप जोशी, ज्ञानेश्वर राक्षे,साहेबराव गुळवे आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले, ब्रिटिशांविरुद्ध पहिला लढा आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी उभारला. त्यानंतर 1857 चे युद्ध झाले. त्यानंतर लोकमान्य टिळक युग व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर मिळालेली राज्यघटना ही सर्वांना मोठी देण असून गोरगरिबांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. मात्र सध्या लोकशाही आणि राज्यघटना धोक्यामध्ये आहे. जाती धर्माच्या नावावर राजकारण केले जात असून धर्मा धर्मा मध्ये फूट पाडली जात आहे.

संगमनेर तालुका हा सततच्या विकास कामातून आपण राज्यात अग्रगण केला. सहकार, शिक्षण, आर्थिक संपन्नता, ग्रामीण विकास, व्यापार येथील चांगले वातावरण यामुळे संगमनेरचा देशात लौकिक वाढवला आहे. संगमनेर तालुक्यात राजकीय आदर्श संस्कृती आहे. सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. तालुक्याचा विकास व एकजूट आपल्याला जपायची असून सर्वांनी एकत्र रहा असे आवाहन त्यांनी केले.

तर देवराम गुळवे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका विकासातून पुढे नेला. सर्व समाजाला त्यांनी जपले. सर्वांना समान संधी दिली. कधीही भेदभाव केला नाही. मात्र काही लोक आता ब्रिटिशांची फोडा तोडा नीती वापरून समाजामध्ये भेद निर्माण करत आहे. आपल्यासाठी कोण काम करते आहे ते लक्षात घ्या असे ते म्हणाले.

तर तानाजी शिरतार म्हणाले की, तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म जपायचा आहे. संगमनेर तालुक्यामध्ये कधीही भेदभावाचे राजकारण झाले नाही परंतु आता नव्याने संगमनेर मध्ये अस्तिर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे. अशा प्रवृत्ती वेळीच रोखा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी रोशन गोफणे, रमेश गफले यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. शरद बोऱ्हाडे, विकास जेडगुले,सचिन जेडगुले,संतोष शिंदे,भाऊ गोफने,रोहिदास गुळवे,समीर चव्हाण,प्रवीण गोफणे, राम बिडवे, शुभम जेडगुले, रोशन गोफणे, अमित जेडगुले, निलेश जेडगुले, गोविंद गोफणे आदी उपस्थित होते. सायखिंडी फाटा येथे प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी संगमनेर मधील कुस्तीप्रेमी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!