Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
टॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शेतीसंगमनेर

टंचाईच्या पार्श्वभूमीवर आवर्तनाचा निर्णय लवकरच होईल-आ.खताळ

यंदाच्या पावसाचे प्रमाण तालुक्यात अत्यल्प आहे. पीकांना असलेली पाण्याची गरज लक्षात घेवून आवर्तन तातडीने सुरू करावे आशी विनंती जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना केली असून येत्या दोन ते तीन दिवसात आवर्तनाचा निर्णय होईल आशी माहीती आ.अमोल खताळ यांनी दिली.

संगमनेर दि.११ प्रतिनिधी

यंदाच्या पावसाचे प्रमाण तालुक्यात अत्यल्प आहे. पीकांना असलेली पाण्याची गरज लक्षात घेवून आवर्तन तातडीने सुरू करावे आशी विनंती जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना केली असून येत्या दोन ते तीन दिवसात आवर्तनाचा निर्णय होईल आशी माहीती आ.अमोल खताळ यांनी दिली.

पाण्याच्या संंदर्भात निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी आ.अमोल खताळ यांची भेट घेवून आवर्तन सोडण्याबाबत निर्णय करावा आशी मागणी केली.

शिष्टमंडळाशी बोलतांना आ.खताळ म्हणाले की,पावसाने ओढ दिल्याने शेतीच्या पाण्याची मोठी अडचण झाली असल्याची जाणीव आपल्याला निश्चित आहे.टंचाई परीस्थीती लक्षात घेवून जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत पाण्याची गरज लक्षात घेऊन आवर्तन सोडण्याची मागणी आपण केली आहे.यासंदर्भात
पालकमंत्री विखे पाटील यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला असून येत्या दोन तीन दिवसात निर्णय होईल आशी ग्वाही आ.खताळ यांनी शेतकऱ्यांना दिली.

यंदाच्या वर्षी धरण भरल्याचे समाधान असले तरी लाभक्षेत्रात पाहीजे तेवढा पाऊस झालेला नाही ही वस्तूस्थिती आहे.त्यामुळे उपलब्ध पाण्यातून काही गावांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन करून तालुक्यातील शेतकर्याना दिलासा द्यावा हीच भूमिका जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मांडली असल्याचे आ.खताळ यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!