Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
अकोलेटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़संगमनेर

बिरोबा देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार;- आ. खताळ

साकूरच्या बिरोबारायांचे आमदार अमोल खताळ यांनी घेतले दर्शन; डफांच्या गजरात उत्स्फूर्त स्वागत

संगमनेर प्रतिनिधी

साकूर येथील बिरोबा देवस्थान सध्या ‘क’ वर्गात असून, या देवस्थानाच्या विकासाला चालना मिळावी यासाठी भविष्यात बिरोबा देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी यावेळी दिली.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी साकूर येथील आराध्य दैवत बिरोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त आ.अमोल खताळ यांचे साकुर पठारभाग महायुतीच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. चांगभलं चांगभलं बिरोबाच्या नावानं चांगभलं असा जयजयकार करत डफांच्या गजरात वाजतगाजत बिरोबाच्या मंदिरात जाऊन बिरोबा रायाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले

आमदार खताळ म्हणाले, “आमदार झाल्यापासून मतदारसंघातील प्रत्येक देवस्थान आणि मंदिराच्या विकासा साठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत. साकूरचे बिरोबा महाराज हे असंख्य भक्तांचे जागृत देवस्थान आहे नारळी पौर्णिमे निमित्त दरवर्षी यात्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होता असतो .या यात्रोत्सवा निमित्त बिरोबारायांचे दर्शन घेण्या साठी आलो आहे.”या भागात नेहमी आल्यानंतर बिरोबा महाराजांना नत मस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेत सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करतो.साकूर परिसरासह संपूर्ण तालुक्यातील बळीराजा सुखी झाला पाहिजे, यंदा चांगला पाऊस पडावा आणि सर्वांना सुख-समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना बिरोबा महाराजांच्या चरणी केली असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
बिरोबा देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाल्यास देवस्थानच्या विविध विकासकामांना अधिक गती मिळेल त्यामुळे शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करून हा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.यावेळी पठारभागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, भाजपा तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, भाजपा कायदा सेल जिल्हा संयोजक ॲड. अमित धुळगंड, खांबे गावचे सरपंच रविंद्र दातीर, सुभाष पेंडभाजे, भिमराज जाधव, मच्छिंद्र खेमनर, किशोर खेमनर, संकेत खेमनर, राजेंद्र गोसावी, बाळू,खेमनर, सचिन खेमनर तुषार पेंडभाजे, संतोष खेमनर, भाऊ डोंगरे, प्रमोद साळुंके, अझहर पटेल, गणेश गाडेकर, संतोष बिडकर, गोरख बागुल, अनिल आमले, सुरेश काळे, गणेश डोंगरे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!