Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
Uncategorizedअकोलेटॉप न्यूज़देशधर्मयुवाराजनीतिराज्यलोकल न्यूज़संगमनेर

रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीन जगाला दिलेली देण – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

बंधूत्वाचा संदेश देणारा सण रक्षाबंधन.....!

संगमन:(सुदिन न्यूज नेटवर्क ) रक्षाबंधन हा प्रेमाचा संदेश देणारा सण संपूर्ण देशामध्ये मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. बहिण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा हा सण भारतीय संस्कृतीतला अत्यंत महत्वाचा सण आहे. भाऊ बहिणीच्या अतुट प्रेमाच एक बंधन त्यामध्ये आहे. रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीन जगाला दिलेली देण असून बंधूत्वाचा संदेश देणारा सण असल्याचे गौरवदगार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

रक्षाबंधनानिमित्त नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या निवासस्थानी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रक्षाबंधन केले. याप्रसंगी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, शरद नाना थोरात आदींसह विविध पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये मोठी विविधता आहे. विविध परंपरा सण मोठ्या आनंदाने आपण साजरे करतो. यामध्ये भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा आणि निस्वार्थी प्रेमाचा संदेश जगाला देणारा हा आदर्शवत असा सण आहे. बहिण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा हा सण भारतीय संस्कृतीतला अत्यंत महत्वाचा सण आहे. भाऊ बहिणीच्या अतुट प्रेमाच एक बंधन त्यामध्ये आहे. रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीन जगाला दिलेली देण असून बंधूत्वाचा संदेश देणारा सण असल्याचे हि ते यावेळी म्हणाले.

महिलांचे शिक्षण महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक भावाचे कर्तव्य आहे. यासाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे असून आदर्श परंपरा जपताना देशात आणि समाजात बंधुभाव वाढीस लागेल यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शहर व तालुक्यातील विविध कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!