संगमनेर ( प्रतिनिधी ) ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांनी राळेगण सिद्धी येथे जाऊन भेट घेतली याचबरोबर त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करून त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली.पद्मभूषण अण्णा हजारे यांनी प्रकृती अस्वस्थामुळे मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. यानंतर ते राळेगणसिद्धी येथे परतले आहेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे राळेगणसिद्धी येथे आले होते.
याप्रसंगी माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पद्मभूषण अण्णा हजारे हे अहिल्यानगर जिल्हा व महाराष्ट्राचे भूषण आहे. सामाजिक राजकीय पर्यावरण ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले कार्य हे पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरणारे आहे. प्रकृती अस्वस्थामुळे ते मुंबई येथे उपचारासाठी गेले होते त्यानंतर ते परतले आहेत त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे.याचबरोबर पावसाने अनेक दिवस उघडीप दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अशा संकट समय काळामध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे याचबरोबर गणेश उत्सवाच्या आगमनाच्या निमित्ताने राज्यभरात पावसाचे जोरदार आगमन व्हावे अशी प्रार्थना ही त्यांनी ईश्वरचरणी केली.
मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, पद्मभूषण अण्णासाहेब हजारे हे कायम सर्वांना आदरस्थानी आहेत. प्रकृती अस्वस्थामुळे ते वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत गेले होते. अण्णांना दीर्घायुष्य लाभो याचबरोबर त्यांचे मार्गदर्शन सदैव सर्वांना मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली.
पद्मभूषण अण्णा हजारे म्हणाले की, राज्याच्या राजकारणात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे योगदान मोठे आहे. स्वच्छ आणि पारदर्शक नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भेटीने आनंद झाला असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी अण्णासाहेब हजारे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर चर्चा केली.