नवीन लोकप्रतिनिधीचे भोजापुर चारित योगदान काय ?
नदीजोड प्रकल्प सांगून तालुक्याचे पाणी पळवले जात आहेत त्यावर बोला सचिन दिघे यांचा सवाल

संगमनेर (प्रतिनिधी)–सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भोजापुर चारी पूर्ण झाली आहे. मागील वर्षी आणि याही वर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाला त्यामुळे पाणी आले. चारी तयार करून ठेवली होती म्हणून पाणी आले. या चारी मध्ये तुमचे योगदान काय असा सवाल करताना तालुक्याचे पाणी पळवले जात असताना नवीन प्रतिनिधी त्यावर एक शब्द बोलत नाही भोजापूर आणि नदीजोड प्रकल्पाची टिमकी वाजवत असल्याची टीका युवक कार्यकर्ते सचिन दिघे यांनी केली आहे.
तळेगाव दिघे येथील युवक कार्यकर्ते सचिन दिघे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की तळेगाव विभाग आणि दुष्काळी भागासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. भोजापुर धरणातून चारीच्या माध्यमातून निमोण व परिसरासाठी पाणी देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला ही चारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून तयार झाली.
ज्या ज्या वेळेस चांगला पाऊस झाला त्या त्या वेळेस पाणी नान्नज दुमाला तळेगाव भागाला मिळाले. यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाला त्यामुळे पाणी आले.
चारी होती म्हणून पाणी नवीन लोकप्रतिनिधी ने काय केले. मागील दोन वर्षांमध्ये तालुक्यामध्ये एकही नवीन काम नाही तळेगाव विभागामध्ये एकही नवीन काम नाही फक्त फ्लेक्स बाजी एवढेच काम आहे.
जनता आपली कामे घेऊन आजही यशोधन कार्यालयातच जात आहे आमदार सत्यजित तांबे व डॉ जयश्रीताई थोरात यांच्या पाठपुराव्यातून सर्वसामान्य जनतेची शासकीय कामे तत्परतेने मार्गी लागत आहे.
नवीन लोकप्रतिनिधीला ठोस कोणतेही काम करता आले नाहीत शासनाकडे पैसा नाही. रस्त्यांची कामे होत नाहीत साधे संजय गांधी निराधार योजनेचे सुद्धा देणे थकले आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे पिण्याच्या पाणी चाऱ्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत.
नवीन लोकप्रतिनिधी मूलभूत प्रश्नांवर बोलले पाहिजे. नदी जोड प्रकल्प त्यावर बोलण्यापेक्षा तालुक्याचे पाणी जाते त्यावर बोला. दुष्काळी परिस्थिती आहे त्यावर बोला पिक विमा का मिळाला नाही त्यावर बोला. तालुक्याची रेल्वे पळवली गेली त्यावर बोला. यावर शब्दही न बोलता भुलभुलय्या केले जात असल्याची ती काही त्यांनी केली.
तळेगाव मधून शिवसेनेमध्ये नव्याने कोणाचाही प्रवेश झाला नाही जे होते तेच लोक पुन्हा अंगावर झूल टाकून मिरवत आहे. तळेगाव परिसर हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याच पाठीशी होता राहील असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


संपादक – सुदिन राजेमाने




