भोजापूर चारीच्या प्रश्नावर दिवाळी पूर्वी जलसंपदा मंत्र्यांसमवेत बैठक घेणार -आ खताळ
तळेगाव दिघे येथे शिवसेना शाखेचा आमदार खताळ यांच्या हस्ते उद्घाटन संगमनेर/ प्रतिनिधी

संगमनेर/ प्रतिनिधी भोजापूर चारीच्या पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दिवाळीपूर्वी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भोजापुर कृती समितीच्या प्रतिनिधींची राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत तुमच्या सूचना ऐकून घेतल्या जातील असा विश्वास आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिला.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन आमदार अमोल खताळ पा.यांच्या हस्ते झाले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे उपसरपंच मयूर दिघे डॉ संतोष डांगे पंढरीनाथ इल्हे मच्छिंद्र दिघे नामदेव दिघे एकनाथ मुंगसे बाळासाहेब दिघे संपत फड गणेश दिघे गणेश बोडखे शिवसेना शाखाप्रमुख शिवाजी दिघे कार्याध्यक्ष संजय कवाडे संजय कदम सचिव उत्तम दिघे खजिनदार दत्तात्रय दिघे उपशाखाप्रमुख राजेंद्र दिघे संतोष दिघे विनायक कांदळकर प्रकाश दिघे संकेत गुंजाळ संजय दिघे किरण दिघे बाळासाहेब दिघे राजेंद्र दिघे निलेश दिघे चांगदेव कांदळकर राजेश दिघे गोरख इल्हे यांच्यासह तळेगाव गटातील शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आ खताळ म्हणाले,कि भोजापूर चारी प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यापूर्वी या प्रश्नावर राजकारण झाले; मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविताना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणींवर मात करून मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे भोजापूर चारीतून सुमारे ७२ दिवस पाणी सुरू ठेवता आले. मात्र, यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याचे नियोजन अधिक महत्त्वाचे ठरले आहे.भोजापूर चारीच्या कामासाठी यापूर्वी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, चारीचे रुंदीकरण व इतर आवश्यक कामांबाबत स्थानिकांनी केलेल्या सूचनांचाही विचार होणे गरजेचे आहे. आपण संबंधित विभागाला पत्र दिले असून, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू असे ही आमदार खताळ यांनी सांगितले
शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून शिवसैनिकांचा परिवार आहे. या परिवारातील कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. शिवसैनिकांना नेतृत्वाची गरज असताना ना. शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना . लाडकी बहीण योजना,शेतकऱ्यांसाठी वीज सवलत सह विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एकनाथ शिंदे स्वतःला मोठे नेते समजण्याऐवजी शिवसैनिक आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करतात. त्याच भूमिकेतून आपणही आमदार असलो तरी सर्वसामान्य जनतेसाठी एक कार्यकर्ता आणि शिवसैनिक म्हणूनच उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले

शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांची कामे करण्यासाठी कोणाची शिफारस किंवा फोन येण्याची वाट पाहण्याची पद्धत बदलली आहे . शेतकरी, महिला आणि तरुणांची कामे विनाकारण प्रलंबित ठेवू नयेत, अशा सूचना देखील आपण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जनतेने आपल्याला निवडून दिले असून, आपली बांधिलकी जनतेशी आहे. त्यामुळे जनतेला त्रास देणाऱ्या किंवा कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत कठोर भूमिका घेतली जाईल. असे ही आमदार खताळ यांनी सांगितले
नदीजोड प्रकल्पाच्या नियोजनात सिन्नर तालुक्यातील काही गावांचा समावेश करण्यात आला होता; मात्र संगमनेर तालुक्याचा समावेश नव्हता. आमदार झाल्यानंतर पाठपुरावा करून भोजापूर परिसरातील काही गावांचा नदीजोड प्रकल्पात समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न केले आहेत. या प्रकल्पाचा लाभ तळेगावसह परिसरातील शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पाण्याचे नियोजन करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या गरजांचा विचार झाला पाहिजे. भविष्यामध्ये जरी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तरी या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, हा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेली दोन वर्षांत तळेगाव आणि परिसरातील विकासकामांसाठी महायुती सरकार आणि पालक मंत्र्यांच्या माध्यमातून सुमारे साडेसात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.तळेगाव येथील बिरोबा महाराज मंदिराच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून मंजूर झालेल्या निधीतील शिल्लक रकमेबाबत पर्यटनमंत्र्यांशी चर्चा करून पुढील कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.


संपादक – सुदिन राजेमाने




