देशधर्ममहाराष्ट्रमुंबईलोकल न्यूज़संगमनेर

देवकवठे येथील माजी सैनिक अण्णासाहेब मुंगसे यांचे दुःखद निधन,

सर्व गावकऱ्यांनी शोकसभा आयोजित करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यानंतर गावच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.

संगमनेर ( प्रतिनिधी ) देवकवठे येथील रहिवासी व भारतीय सैन्यांमध्ये 22 वर्ष सेवा देणारे माजी सैनिक अण्णासाहेब गणपत मुंगसे यांचे आजाराने वयाच्या 57 व्या दुःखद निधन निधन झाले आहे.
अण्णासाहेब मुंगसे यांनी भारतीय सैन्यामध्ये 22 वर्ष सीमेवर सेवा दिली. काश्मीर ,अरुणाचल प्रदेश, हिमालय पंजाब अशा राज्यांबरोबरच श्रीलंकेमध्येही ते सैन्याबरोबर गेले होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शिर्डी येथे साई संस्थान मध्ये ही काही काळ आपली सेवा दिली.

यानंतर गावात स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय सुरू करून गावच्या सामाजिक कार्यामध्ये सातत्याने सहभाग घेतला. गावच्या सेवा सोसायटीचे ते सक्रिय संचालक होते. अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे असलेले अण्णासाहेब मुंगसे हे मेजर नावाने परिसरामध्ये परिचित होते. मागील दोन महिन्यांपासून ते आजारी होते त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरू होते मात्र अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने देवकवठे सह पंचक्रोशी मध्ये मोठी हळहळ निर्माण झाली. विजयादशमीच्या मुहूर्तावर गावामध्ये सप्ताहाची सांगता असताना अत्यंत शांततेमध्ये शांतता करण्यात आली याचबरोबर गावांमध्ये कुठेही सन साजरा करण्यात आला नाही. सर्व गावकऱ्यांनी शोकसभा आयोजित करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यानंतर गावच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, वीरपत्नी सविता, मुलगा तुषार, व दोन मुली, भाऊ अर्जुन मुंगसे, सुरज मुंगसे असा परिवार आहे.

मेजर अण्णा मुंगसे यांच्या दुःखद निधनाबद्दल काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, भारत शेठ मुंगसे, भागवतराव आरोटे, एकनाथ शेठ मुंगसे, सुभाष सांगळे, राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगसे, शिवराज मुंगसे, नामदेव कहांडळ, ज्ञानेश्वर मुंगसे, तुकाराम कहांडळ, बाबासाहेब गाजरे, विश्वनाथ आरोटे, अशोक मुंगसे, शांताराम आरोटे यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी मान्यवर यांनी शोक व्यक्त केला आहे.

संपादक – सुदिन राजेमाने

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!