धर्ममहाराष्ट्रमुंबईयुवालोकल न्यूज़संगमनेर

आवजीनाथ बाबा देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आमदार खताळ

आवजीनाथ बाबा देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आमदार खताळ

संगमनेर : प्रतिनिधी
“अवजीनाथ बाबांचे देवस्थान हे जागृत देवस्थान असून हे देवस्थान , सर्व समाजासाठी आदर्श आणि प्रेरणास्थान आहे. या देवस्थानाच्या विकासासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत असून, या मंदिराचा क वर्ग दर्जात समावेश आहे परंतु तो ब वर्ग करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे त्यासाठी तुमची सर्वांची साथ मला हवी आहे असा विश्वास आमदार अमोल खताळे यांनी व्यक्त केला
संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील आवजीनाथ बाबा यात्रा उत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ पाटील यांनी आवजीनाथ बाबांचे दर्शन घेऊन शुभ आशीर्वाद घेतला त्यावेळी आयोजित कार्यक्रमा मध्ये ते बोलत होत यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पन्नास लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले

यावेळी चंद्रकांत कर्पे, ऍड गोरक्ष कापकर, सी.ए. भास्कर, मुर्तडक, घनश्याम भास्कर, ॲड. शरद काकड, नवनाथ जोंधळे, गणेश वराडे, राहुल आहेर, सुदर्शन पोकळे, राहुल महाराज पोकळे, शरद येलमामे, शरद मुर्तडक, नवनाथ कानकाटे, शंकर रानमाळे यांच्यासह श्री आवजीनाथ बाबा मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, शिवसेना महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की आवजीनाथ बाबा देवस्थानाच्या विकासासाठी यापूर्वी पर्यटनाच्या माध्यमातून २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. मात्र, केवळ निधी देऊन विकास होत नाही, तर कामाचा दर्जा आणि गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे, यावरही त्यांनी भर दिला. आवजीनाथ बाबांच्या देवस्थानाशी माझे अनेक वर्षांपासून श्रद्धेचे नाते आहे. मी अनेक वर्षांपासून येथे दर्शनासाठी येत आहे. देवस्थानाची महती आणि त्याविषयी भाविकांच्या मनात असलेली श्रद्धा मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणच्या विकासासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. देवस्थानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच कामाचा दर्जा चांगला राहावा, या कडेही माझे लक्ष असेल. असेही आमदार खताळ यांनी सांगितले

‘ब’ वर्ग देवस्थानासाठी विशेष प्रयत्न केले
“गतवर्षी मी नवीन होतो तरी हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यात आला आहे . यावर्षी किमान तीन देवस्थानांना, तर पुढील वर्षी पाच देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील.”ब’ वर्ग देवस्थानाचा दर्जा मिळाल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून विकासासाठी निधी उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे देवस्थानांचा नियोजनबद्ध विकास करता येतो. या प्रक्रियेसाठी ग्रामस्थ आणि देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.यापूर्वीच्या कामकाजा बाबत तुमचे काही अनुभव वाईट असू शकतात; मात्र माझ्या कार्य काळात देवस्थाना च्या विकासाबाबत तुम्हाला निराशा येऊ देणार नाही. देवस्थानाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे, मीही त्यांच्या सोबत उभा राहीन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार
तालुक्यात सरसकट पीक पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पंचनाम्यांची प्रक्रिया करण्यात आली असून, दुष्काळी परिस्थितीत आम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.”
दुष्काळाच्या काळात केवळ शासनावर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाने अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. गावातील किंवा परिसरातील एखादा शेतकरी संकटात असेल, तर त्याला मदतीचा हात देऊन पुन्हा उभे करण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुलींसाठी ५०० सायकली, ५०० शिलाई मशीनचे आश्वासन
शिवसेनेच्या माध्यमातून संगमनेर मतदारसंघातील विद्यार्थिनी आणि महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार खताळ यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघातील शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी ५०० सायकली आणि महिलांसाठी ५०० शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या त्रासाविरोधात कारवाईचा इशारा
ग्रामीण भागातील शेतकरी
आदिवासी बांधवांना फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी त्रास दिला जात असल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशाराही आमदार खताळ यांनी दिला.

संपादक – सुदिन राजेमाने

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!