Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
टॉप न्यूज़महाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़संगमनेर

संगमनेर तालुक्यातील पतसंस्थांचे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

सहकार क्षेत्रात पतसंस्थांच्या माध्यमातून मोठी क्रांती-माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर-सुदिन न्यूज नेटवर्क

संगमनेर तालुक्यातील पतसंस्थांच्या 2400 कोटींच्या ठेवी असून संगमनेरच्या विकासासाठी मोठा हातभार लावला आहे. प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे पतसंस्थांच्या कामकाजात निकोप वाढ होऊन पतसंस्थेच्या कामाचा गुणवत्ता पूर्वक दर्जा सुधारेल.नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व संगमनेर तालुका पतसंस्था फेडरेशन चा हा उपक्रम कौतुकास्पद असून पतसंस्थांच्या चळवळीला बळ देणारा आहे.संगमनेर तालुक्याच्या विकासाला पतसंस्थांचे फार मोठे योगदान लाभलेले आहे.सहकार क्षेत्रात पतसंस्थांच्या माध्यमातून मोठी क्रांती झाली आहे.असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे

संगमनेर येथील भंडारी मंगल कार्यालय येथे नाशिक विभागीय नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था फेडरेशन,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संगमनेर तालुका पतसंस्था फेडरेशन व तालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संचालक मंडळ,सीईओ, जनरल मॅनेजर यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष काकासाहेब कोयटे,माजी सहकार आयुक्त व निबंधक शैलेश कोतमीरे,अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर,नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षवसंत लोढा,कार्याध्यक्ष गोपाळ पाटील,व्यवस्थापक महेश जाधव,संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष बापूसाहेब टाक,संतोष कोटे,सायबर तज्ञ अथर्व भांबुरकर,मराठा सेवा पतसंस्थेचे उपाध्यक्ष उदय अनभुले,संग्राम पतसंस्थेचे चेअरमन राणीप्रसाद मुंदडा आदी उपस्थित होते.

काकासाहेब कोयटे म्हणाले, प्रशिक्षण हे पतसंस्थेच्या विकासाचा गाभा असून आज या ठिकाणी माजी सहकार आयुक्त शैलेश कोतमीरे व माजी अप्पर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर यांनी या प्रशिक्षण वर्गात पतसंस्थांना विशेष मार्गदर्शन केले आहे. अहिल्यानगर हा जिल्हा सहकाराचा बालेकिल्ला असून संगमनेर तालुका हि सहकाराची कामधेनू आहे.

वसंत लोढा म्हणाले,नगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ ही महाराष्ट्राच्या पतसंस्था चळवळीला मार्गदर्शक व्हावी.या उद्देशाने नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा पद्धतीने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संगमनेर तालुक्यापासून प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात आला आहे.जिल्ह्यातील पतसंस्थांच्या बराच मोठ्या अडचणी आहेत.अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून पतसंस्थांना वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य अपेक्षित आहे.जिल्हा बँकेच्या असलेल्या 25% ठेवी पतसंस्थांच्या आहेत. त्याबाबतीत माननीय बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घालून जिल्हा बँकेच्या माध्यमातून पतसंस्थांना मदत व सहकार्य होईल असे करावे.या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेसाठी संगमनेर तालुक्यातील पतसंस्थांचे 200हुन अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणीप्रसाद मुंदडा यांनी केले.तर आभार संगमनेर तालुका फेडरेशनचे अध्यक्ष बापूसाहेब टाक यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!