भगवान श्री जिव्हेश्वर महाराज जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा
आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून समाजासाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल....राहुल भाऊ खताळ

संगमनेर :(सुदिन न्यूज नेटवर्क)
सकल समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्री जिव्हेश्वर महाराज जन्मोत्सवानिमित्त मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी साळीवाडा, संगमनेर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वकुळ साळी समाजाचे लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट, साळीवाडा, संगमनेर, तसेच स्वकुळ साळी युवा मंच, स्वकुळ साळी महिला मंच आणि समस्त स्वकुळ साळी समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जन्मोत्सवाला समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
जन्मोत्सवानिमित्त पहाटे भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांचा महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी श्री भगवान जिव्हेश्वर पोथीवाचन, जन्मोत्सव सोहळा, सत्यनारायण महापूजा, अल्पोपहार आणि महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले.
कार्यक्रमातील महाआरती मा. राहुल भाऊ खताळ यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित समाजबांधवांनी महाआरतीत सहभागी होऊन भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांचे दर्शन घेतले.
यावेळी बोलताना राहुल खताळ यांनी मा.आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून समाजासाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध
करून देण्यात येईल, अशी माहिती दिली. तसेच समाजाच्या विविध सामाजिक उपक्रमांना आणि सामाजिक कार्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जन्मोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांनंतर उपस्थित समाजबांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील बंधू-भगिनींनी सहकुटुंब उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.पुरोहित संघाचे भाऊ जाखडी यांनी १११११ रुपयांची देणगी समाजकार्यासाठी दिली
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुश केसेकर, सचिन कांबळे, राम पेटकर, संतोष कनोजे, योगेश मांगलेकर, प्रशांत केसेकर, गणेश केंद्रे, निलेश कनोजे, सचिन वर्षे, सचिन उपरे, सुनील दुर्गुळे, मल्हार बुरसे,अवधूत दुर्गुळे, बाळासाहेब खाडे, सुनील कांबळे, शेखर कांबळे, संजय भिंगरे, घनश्याम उपरे, सुदर्शन सदाफुले आणि विनायक भंडारी सचिन बुरसे , बाळासाहेब जठार,प्रशांत मंद्रे , संदेश केसकर,अरुण उपरे,सुभाष भंडारी, घनश्याम भंडारी यांच्यासह अनेक समाजबांधवांनी उपस्थित राहून विशेष प्रयत्न केले.
तसेच ज्येष्ठ समाजबांधव भरतशेठ केसेकर, शरद दुर्गुळे सर आणि सुभाष सदाफुले यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. सर्व समाजबांधवांनी एकत्रितपणे कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडत जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त समाजातील बंधू-भगिनींमध्ये भक्ती, उत्साह आणि एकोप्याचे वातावरण निर्माण झाले होते. एकजुटीने आणि उत्साहाने साजरा झालेला हा जन्मोत्सव समाजाच्या सामाजिक व धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविणारा ठरला.




