Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
अकोलेटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़संगमनेर

आग्रा ते राजगड गरुडझेप मोहिमेचे आमदार खताळ यांनी केले स्वागत

शिव व्याख्याते एस झेड देशमुख ऍड मारुती गोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

संगमनेर : सुदिन न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेला ३६० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्त आग्रा ते राजगड अशी तब्बल १हजार ३१० किलोमीटरची ‘गरुडझेप मोहीम’ राजगडाकडे जाताना संगमनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे आ. अमोल खताळ यांच्या हस्ते या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारातील पायदळाचे प्रमुख सरदार पिलाजीराव गोळे यांचे वंशज ॲड. मारुती(आबा) गोळे यांच्या नेतृत्वाखाली आग्रा ते राजगड अशा निघालेल्या गरुडझेप मोहिमेचे घुलेवाडी शिवारातील शिवसर्कल येथे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले त्यानंतर ही मोहीम संगमनेर शहरात दाखल झाली
संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आमदार अमोल खताळ, शिव व्याख्याते एस झेड देशमुख ऍड मारुती गोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी वातावरण शिवमय झाले होते . यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!