Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
टॉप न्यूज़महाराष्ट्रयूपीराज्यलोकल न्यूज़संगमनेर

वीज उपकेंद्रासाठी नगरपरिषदेने एक महिन्यात जागा उपलब्ध करून द्यावी

आमदार खताळ यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली सूचना

संगमनेर प्रतिनिधी :
संगमनेर शहरातील वीजसमस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने महावितरण कंपनीला १ महिन्याच्या आत जागा उपलब्ध करून तर, नवीन विजेचे उपकेंद्र होऊ शकते अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी नगर पालिका प्रशासनाकडे केली आहे.
संगमनेर शहरातील वाढती वीज गरज लक्षात घेता कमी दाबाचा तसेच वारंवार खंडित होत असणाऱ्या वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी कोल्हेवाडी रोड येथील जलकुंभा शेजारील नगरपरिषदेच्या मालकीची सुमारे ९.५ गुंठे जागा ३३ /११ के.व्ही. विद्युत उपकेंद्र उभारणी साठी महावितरणने मागणी केली होती. त्यानुसार संगमनेर नगरपरिषदे च्या सर्वसाधारण सभेने ठराव करून रेडी रेकनर दरानुसार भाडेतत्त्वावर महावितरणला देण्यास मान्यता दिली आहे .मात्र, सदर जागा रहिवासी भागातील ओपन स्पेस असल्याने तिची विक्री करता येणार नसल्याचे तसेच ती जागा भाडेतत्त्वावर देण्या बाबत काही प्रशासकीय अडचणी असल्याचे नगरपरिषद प्रशासना कडून कळविण्यात आले. त्यामुळे विद्युत उपकेंद्र उभारणीचा विषय पुन्हा प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, संगमनेर शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वीज वापरातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक भागांमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा होणे, वारंवार वीज खंडित होणे तसेच वाढत्या वीज भारामुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन विद्युत उपकेंद्र उभारणे आवश्यक असल्याचे नगरपरिषदे प्रशासनास सांगितले आहे
महावितरण कार्यकारी अभियंत्यां सोबत नुकतीच बैठक झाली या बैठकीत महावितरणला जागा उपलब्ध झाल्यास संगमनेर शहरा तील कमी दाबाचा वीजपुरवठा व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा या समस्या कमी होऊन त्या कायम स्वरूपी दूर करण्यास मदत होणार असून जागा उपलब्ध होऊन ३३/११ के.व्ही. या विद्युत उपकेंद्राचे काम तातडीने हाती घेतले जाईल असे कार्यकारी अभियंत्यांनी आमदार खताळ यांच्यासमोर सांगितले त्यानंतर नगरपरिषदेच्या सर्व साधारण सभेने यापूर्वीच घेतलेल्या ठरावाचा विचार करून तसेच संगमनेर शहरातील नागरिकांचे हित लक्षात घेत कोल्हे वाडी रोड येथील जलकुंभाशेजारील ९.५ गुंठे जागा योग्य त्या अटी व शर्तींच्या अधीन राहून महावितरण कंपनीला भाडे तत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशा सूचना आमदार खताळ यांनी नगरपरिषद प्रशासनाला केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!