Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
टॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़संगमनेर

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ऊस विकास मेळावा

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार व कारखान्याची वाटचाल सुरू आहे...व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले

संगमनेर :(सुदिन न्यूज नेटवर्क)

ऊस हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत पीक असल्याने एकरी उत्पादन वाढ व्हावी याकरता मा.कृषी व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता खांडगाव येथे भव्य ऊस विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार व कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. शेतीमालाला सध्या भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे मात्र ऊस हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पादन ठरले आहे. एकरी ऊस उत्पादन वाढावे याकरता वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी व कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरता नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी याकरता खाडगाव येथील बेणेमळा येथे गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता मा.महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य ऊस विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात,ॲड माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे,लहान भाऊ गुंजाळ, शंकरराव खेमनर,सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे,रणजितसिंह देशमुख,हौशीराम सोनवणे,रामहरी कातोरे,रमेश गुंजाळ,आर.बी.राहणे, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे,सौ.अर्चनाताई बालवडे यांच्यासह विविध पदाधिकारी शेतकरी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मांजरी व बारामती येथील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

तरी या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक युवक व ऊस उत्पादक, सभासद, शेतकरी, यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!