अकोलेक्राइमटॉप न्यूज़देशधर्ममहाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़शिक्षणशेतीसंगमनेर

अकोले शहरात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई: १० हजारांचा गुटखा जप्त; पुरवठादारासह ५ जणांवर गुन्हा दाखल, ४ जणांना अटक

टपरीचालकांसह मुख्य माल पुरवणाऱ्या तांबोळी याच्यावरही अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या कलम ५९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​अकोले:(सुदिन न्यूज नेटवर्क}
शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गुटखा व पानमसाला विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने गुरुवारी धडक कारवाई केली. शहरातील चार नामांकित पानटपऱ्यांवर अचानक टाकलेल्या छाप्यात सुमारे १० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादारासह एकूण पाच जणांविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार टपरीचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
​माध्यमांच्या वृत्ताची दखल
अकोले शहर आणि तालुक्यात बंदी असलेला गुटखा सर्रासपणे आणि खुलेआम विकला जात असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे पथक तातडीने सक्रिय झाले आणि गुरुवारी सकाळी अकोले शहरातील संशयित ठिकाणांवर अचानक तपासणी मोहीम राबवली.
​कारवाईतील संशयित व जप्त मुद्देमालबसस्थानक परिसरात प्रशासनाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात खालील चार पानटपऱ्यांमध्ये विविध नामांकित कंपन्यांचा बंदी असलेला गुटखा आणि पानमसाला विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे उघडकीस आले:
​गुलकंद पान स्टॉल – अबुजर बागवान
​वर्षा पान स्टॉल – अभिजित नाईकवाडी
​अगस्ती कोल्ड्रिंक्स – नंदकुमार गायकवाड
​साई पान स्टॉल – रोहिदास आंबरे
​या चारही ठिकाणांवरून पोलिसांनी सुमारे १० हजार रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त केला.
​मुख्य पुरवठादारावरही गुन्हा
कारवाईदरम्यान संबंधित टपरीचालकांची चौकशी केली असता, हा सर्व माल ‘तांबोळी’ नामक व्यक्तीकडून पुरवला जात असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे चार .टपरीचालकांसह मुख्य माल पुरवणाऱ्या तांबोळी याच्यावरही अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या कलम ५९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे यातील चार विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून उशिरापर्यंत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.

​ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोपान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. प्रदीप पवार, उमेश सूर्यवंशी आणि नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!